महाराष्ट्र हवामान : पुन्हा एकदा थंडीला सुरुवात ! पहा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील तापमान…

Published on -

१ जानेवारी २०२५ पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होत आहे.आकाश निरभ्र झाल्यामुळे विविध भागांत किमान तापमानात घट होत आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले होते. तसेच ढगाळ हवामान होऊन थंड वाऱ्यांना अडथळे झाले होते. परिणामी, राज्यातील कडाक्याची थंडी गायब झाली होती. मात्र गेले तीन दिवस काही भागांत ढगाळ हवामान कमी होऊन आकाश निरभ्र होऊ लागले आहे.

संपूर्ण राज्यात मंगळवारी हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. १ ते ६ जानेवारी दरम्यान राज्यात हवामान कोरडे हवामान राहणार आहे.राज्यात सर्वात जास्त तापमान रत्नागिरी येथे ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई २२.२, सांताक्रुझ २०.३, रत्नागिरी २१.७, डहाणू १९.९, पुणे १५.४, लोहगाव १७.४, अहिल्यानगर १५.५, जळगाव १५.९, कोल्हापूर १८.२, महाबळेश्वर १५, मालेगाव १८, नाशिक १६.६, सांगली १८.५, सातारा १६.९, सोलापूर १८.६, छत्रपती संभाजीनगर १७.४, परभणी १८, अकोला १८.६, अमरावती १६.८, बुलढाणा १८.४, ब्रह्मपुरी १६.१, गोंदिया १३.५, नागपूर १६.४, वाशिम २०, वर्धा १७.४

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!