लग्नाळू नवरदेवांनो सावधान! अहिल्यानगरमध्ये लग्नासाठी पोरगी दाखवून गंडवणारी टोळी सक्रीय!

अकोले- तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या पालकांच्या विवशतेचा गैरफायदा घेणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीने सोशल मीडियाचा आधार घेत अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले असून, प्राथमिक सदस्यत्वाच्या नावाखाली १० हजार रुपये उकळले जात आहेत. विशेषतः वीरगाव परिसरातील अनेक कुटुंबे या फसवणुकीला बळी पडली आहेत. ही टोळी अनाथ आश्रमातून … Read more

आजपासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी झाली सुरू, कसा करायचा अर्ज जाणून घ्या सविस्तर!

पुणे- गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (पुणे म्हाडा) गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे वितरण आता “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र व्यक्तींना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १० एप्रिल … Read more

मंत्री महोदय होणार डिजीटल, बैठकीत कागदाऐवजी वापरणार आता आयपॅड, सरकारने मंत्र्यासाठी केली १ कोटींची आयपॅड खरेदी

मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका कागदविरहित स्वरूपात पार पाडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४१ मंत्र्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळाली असून, यासाठी १ कोटी १६ लाख ६५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या अंतर्गत ५० आयपॅड आणि त्यासोबत आवश्यक संलग्न साहित्याची खरेदी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा मार्चअखेर ४८ कोटी रूपयांचा निधी खर्चायचा बाकी, खर्चाची जुळवाजुळव अजूनही सुरूच!

नगर जिल्हा परिषदेचा मार्चअखेर ४८ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला असून, विभागीय खर्चात तफावत आहे. खर्चाच्या अंतिम जुळवाजुळवीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून, अखर्चित रकमेचा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

नेवासा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ २६ गावांसाठी ५३ कोटींचा निधी केला मंजूर

नेवासा- तालुक्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधित आणि पुनर्वसित गावठाणांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावांसाठी तयार करण्यात आलेल्या २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात यासंदर्भात त्यांनी लक्षवेधी मांडली होती, ज्यामुळे हा प्रस्ताव मार्गी … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ बाजार समितीला कांद्याने केले मालामाल! २ कोटी ८ लाखांचा कमावला निव्वळ नफा

पारनेर- तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गत आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ४२६ कोटी ४० लाख ८७४ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यातून खर्च वजा जाता, बाजार समितीला २ कोटी ८ लाख ९२ हजार ४१५ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती सभापती किसनराव रासकर आणि माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली. कांदा खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या … Read more

अहिल्यानगरमध्ये भोंग्यांची दहशत, मान वळवेल तिकडे भोंगेच भोंगे; शाळा-रुग्णालय परिसरात नियमांची धज्जी

अहिल्यानगर- शहरात ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. प्रत्येक गल्ली आणि वॉर्डात भाजीविक्रेते, फळविक्रेते, तसेच भंगार आणि रद्दी खरेदी करणाऱ्यांकडून चायनामेड ध्वनिक्षेपकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या भोंग्यांमुळे नागरिकांचे डोके अक्षरशः किर्रर्र होत असून, त्यांचे रोजचे जीवन अस्वस्थ झाले आहे. विशेष म्हणजे, शाळा आणि रुग्णालय परिसरातील सायलेंट झोनमध्येही हीच परिस्थिती दिसून येते. अनेक … Read more

महाराष्ट्र हादरला! ‘या’ जिल्ह्यातील तब्बल १४ हजार महिलांना कॅन्सरचा धोका? अहवालामुळे उडाली खळबळ

हिंगोली- मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संजीवनी अभियानातून महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान हादरवणारा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल १३,९५६ महिला कर्करोगाच्या संशयित रुग्ण असल्याचे उघड झाले आहे. या महिलांची पुढील तपासणीसाठी तालुका स्तरावर स्क्रिनिंग करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. ही … Read more

केदारनाथ दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू, कधीपर्यंत चालू राहणार बुकींग आणि किती येणार खर्च, जाणून घ्या सविस्तर!

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा 2025 ला काही दिवसांनंतर सुरू होणार असून, त्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या वर्षीही केदारनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार प्रशासनानेही आपली तयारी सुरू केली आहे. जर तुम्ही केदारनाथ यात्रेसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार आणि त्यासाठी किती खर्च येणार याबाबत … Read more

वंदे भारत, शताब्दी, राजधानी या प्रीमियम रेल्वे गाड्यांचे खरे मालक कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर!

भारतीय रेल्वे सध्या हायस्पीड ट्रेनच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. वंदे भारत, शताब्दी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या सुपरफास्ट गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आहेत. पण या प्रीमियम ट्रेनांचे खरे मालक कोण आहेत, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? दुसरीकडे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) ला नवरत्न … Read more

भारतात पहिल्यांदा कॉफीची लागवड कुठे झाली? आनंद महिंद्रांनी ‘कॉफी’चा इतिहास उलगडत सांगितले “ते’ ठिकाण

महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योगसमूहाचे प्रमुख आणि भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडिया अकाऊंट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यांनी काय बोलावे, कोणत्या विषयावर व्यक्त व्हावे किंवा कोणत्या ठिकाणाचा उल्लेख करावा, यापासून ते त्यांच्या पोस्टपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. नुकतेच त्यांनी X वर … Read more

हायपरटेंशन, डायबिटिस बरोबरच भारतीयांना ‘या’ समस्यांनी ग्रासलं, हादरून टाकणारा आरोग्य अहवाल समोर!

भारतात 2024 मध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांनी लोकांना मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. या वर्षी रुग्णांनी जीवनशैलीच्या आजारांसाठी सरासरी 4.1 वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला, जो 2023 मध्ये 3.4 वेळा होता. संशोधनातून असे समोर आले आहे की, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि वजनवाढ या समस्या भारतीयांसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त, 7 एप्रिल 2024 रोजी, भारतीय … Read more

सर्वाधिक कमाई करणारे भारतातील हे आहेत ५ रेल्वे स्टेशन, पाचव्या रेल्वे स्टेशनने यावर्षी केली तब्बल एवढ्या कोटींची कमाई!

भारतातील रेल्वे जाळे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे, जिथे ७३०८ हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. ही स्थानके केवळ प्रवाशांच्या सोयीपुरती मर्यादित नसून, भारतीय रेल्वेसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत बनली आहेत. रेल्वे स्थानकांमधून मिळणारे उत्पन्न हे प्लॅटफॉर्म तिकीट, दुकाने, जाहिराती आणि इतर सुविधांमधून मिळते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात काही रेल्वे स्थानकांनी प्रचंड कमाई करून … Read more

महाराष्ट्राच्या शेजारील हे राज्य आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध राज्य, जगभरातून इथे दरवर्षी येतात लाखो पर्यटक

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेले एक राज्य भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे राज्य म्हणजे गोवा, ज्याला पर्यटकांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यात केवळ दोन जिल्हे आहेत – उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. तरीही, या छोट्या राज्यात पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणे आहेत. ज्यामुळे देश-विदेशातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. गोव्याचे निसर्गसौंदर्य, … Read more

भारतात आयफोन महागणार? ॲपलनं अवघ्या तीन दिवसात पाच विमाने भरून आयफोन पाठवले अमेरिकेत

सध्या जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या टॅरिफ धोरणाची जोरदार चर्चा आहे. या धोरणामुळे शेअर बाजारात घसरण झाली असून, अनेक कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक कीर्तीची अ‍ॅपल कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अवघ्या तीन दिवसांत पाच विमाने भरून आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे भारतातून अमेरिकेत पाठवली. … Read more

अहिल्यानगर शहरातील अद्ययावत ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू ग्रंथालयासह अँपी थिएटर, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध होणार

अहिल्यानगर – सावेडी उपनगर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. या ग्रंथालयासाठी पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध झाला आहे. सद्यस्थितीत प्लिंथ लेव्हलपर्यंत काम पूर्ण झाले आहे. येत्या दीड वर्षात काम पूर्ण होऊन ग्रंथालय कार्यान्वित होणार असल्याची आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

पंढरपूरच्या महिलेला गणपती बाप्पा पावला! गणेश मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताच लागली २१ लाखांची लाॅटरी

पंढरपूर- महाराष्ट्रात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे, जिथे पंढरपुरातील एका साध्या स्वच्छता कामगार महिलेचे नशीब एका क्षणात बदलले. गणेश मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तिला २१ लाख रुपयांची लॉटरी लागली. या महिलेचे नाव मनीषा वाघेला असून, तिने या घटनेला “पांडुरंग पावला” असे संबोधत आपला आनंद व्यक्त केला आहे. ही बातमी ऐकून परिसरातील लोकांनाही सुखद धक्का … Read more

महाराष्ट्रातील या ठिकाणी आहे भारतातील सर्वात डेंजर हिल स्टेशन! गेला नसाल तर नक्की भेट द्या!

महाराष्ट्रात एक असे हिल स्टेशन आहे, जे भारतातील सर्वात धोकादायक मानले जाते आणि तिथे कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही. मग तो कितीही मोठा श्रीमंत असो किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच असो, त्यालाही पायी चालावे लागेल. हे ठिकाण आहे माथेरान, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटे हिल स्टेशन. इथे वाहने दूर ठेवून, पायी फिरतच या निसर्गरम्य स्थळाचा आनंद … Read more