महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आरोपीस अटक !

अकोले, २० मार्च २०२५: महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंबड (ता. अकोले) येथील गवनेर सरोदे यास अकोले पोलिसांनी बुधवारी पहाटे पुण्यात अटक केली. अकोले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नरेंद्र रामभाऊ भोर (रा. आंबड) यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गवनेर सरोदे विरोधात विविध कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गोहत्येच्या आरोपाखाली ८ सराईत गुन्हेगार हद्दपार – नेमकं काय घडलं?

२० मार्च २०२५, नेवासे : महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी घातलेली असूनही, नेवासे येथील आठ सराईत गुन्हेगारांनी सातत्याने गोवंशाची कत्तल केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी … Read more

पक्षपाती कामकाजाचा करणाऱ्या सभापती राम शिंदेंविरुद्ध अविश्वास ठराव

२० मार्च २०२५, मुंबई : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर सभागृहाचे कामकाज पक्षपाताने आणि एकतर्फीपणे चालवल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी लावला आहे. सभागृहाचे कामकाज नियमांनुसार होत नसून, विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे हक्क डावलले जात असल्याने सभापतींनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, असा दावा करत त्यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. महाविकास … Read more

दिवसा उन्हाचा तडाखा अन रात्री बोचरी थंडी ; विषम हवामानामुळे अनेक आजार वाढले

अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दिवसा उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून रात्री व पहाटेच्या सुमारास बोचरी थंडी जाणवत आहे.या विषय हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांना सर्दी,पडसे,ताप, खोकला अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे दुपारच्या वेळी सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत असून अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.सकाळी … Read more

वणव्यांनी शेकडो हेक्टर वनसंपदेची झाली राख अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव; दुर्मिळ औषधी वनस्पतीं नामशेष होण्याच्या मार्गावर

अहिल्यानगर : वणवा हा निसर्ग संपदा व वन्य प्राण्यांसाठी खूपच घातक ठरत असतो. नगर तालुक्यात एकाच महिन्यात विविध ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदेची अक्षरशः राख झाली आहे. वणव्यांमुळे वन्यप्राण्यांचे हाल झाले तर दुर्मिळ औषधी वनस्पतींना फटका बसला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगर तालुक्यात वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. आर्मीचे सुमारे दोन … Read more

यांत्रिक युगात गाढवांचीही वाढली किंमत : मढीच्या बाजारात गाढवांना मिळाली इतकी मोठी किंमत

अहिल्यानगर : मढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी आली होती. यावर्षी गाढवांच्या खरेदी विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे बोलले जात होते. श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार राज्यातच नव्हे तर देशात मोठा चर्चेचा विषय मानला जातो. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मधून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी येतात आणि या खरेदी … Read more

रंगपंचमीला भटक्यांच्या पंढरीत खिशेकापुंची झाली दिवाळी ; अनेक भाविकांचे दागिने, मोबाइल, पैसे केले लंपास

अहिल्यानगर : रंगपचंमीच्या दिवशी मढी येथे सुमारे सात ते साडेसात लाख भाविकांनी चतुर्थ्यी व रंगपंचमी अशा दोन दिवसात (नाथभक्तांनी) कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मात्र वाहतुक कोंडी,खिसेकापुंचा व पाकीटमारांचा प्रचंड धुमाकुळ अशा अडचणी नेहमीप्रमाणे आल्या. त्यामुळे अनेक भाविकांना फटका बसला. मढी ग्रामपंचायत व देवस्थान समितीने भाविकांना पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मढी … Read more

५०वर्षांपासुन ‘ते’ प्रश्न न सुटल्याने कोतवालांचे आजपासून कामबंद

अहिल्यानगर : चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा,या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कोतवालांनी (महसूल सेवक) आज गुरूवारपासून पासून काम बंद आंदोलनाही हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु होणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांनी दिली. मंगळवारी कोतवाल संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन … Read more

Ahilyanagar Breaking : मोठी बातमी ! विखे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश, धक्कादायक प्रकरण समोर

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधून एक मोठी बातमीसमोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले. नेमके काय घडले ? काय आहे प्रकरण? पाहुयात सविस्तर.. पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब केरूणात विखे पाटील व दादासाहेब पवार, एकनाथ घोगरे, अरुण कडू यांनी … Read more

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय ! मतदार ओळखपत्र आणि आधार जोडणी प्रक्रियेस वेग

केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जोडणीसाठी तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यमान कायद्यांच्या चौकटीत राहून पुढील कार्यवाही होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी आणि गृहमंत्रालयाशी चर्चा मंगळवारी निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्रालय तसेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ … Read more

शिर्डी विमानतळावर बिबट्यांची वस्ती ? वनविभाग आणि विमानतळ प्रशासनात गोंधळ

शिर्डी विमानतळ परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मादी बिबट्या दोन पिल्लांसह या भागात फिरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने मंत्रालयात वनविभागाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डी विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी नाशिक येथील मुख्य वनरक्षक कार्यालय तसेच कोपरगाव वनविभागाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वनविभागाकडून कोणतेही ठोस प्रत्युत्तर … Read more

कर्जत जामखेडचं राजकारण तापलं! रोहित पवारांविरोधात भाजपचा हल्लाबोल

कर्जत येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर राजशिष्टाचार शिकण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. यावर भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशाच्या सर्वोच्च लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या लोकांनी सभापतींना शिष्टाचार शिकवण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर त्यांनी … Read more

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलासह तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी आणि सोमवारी या घटना घडल्या असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येची कारणे स्पष्ट नाहीत, मात्र पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १६ वर्षीय मुलाने घेतला गळफास पहिली … Read more

श्रीगोंद्यात गुंडांची दहशत ! आमदार विक्रम पाचपुते आक्रमक

श्रीगोंदे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केली. चोरी, दरोडे, रस्तालुट, खून, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दाणेवाडी येथे माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेच्या तातडीने … Read more

अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा पुन्हा सुरू!

१९ मार्च २०२५, अहिल्यानगर : नागरिकांना बसस्थानकांवर आणि एसटी बसगाड्यांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, बसस्थानकांवर स्वच्छता ठेवली जावी, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था असावी, तसेच अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा त्वरित सुरू व्हावी, या मागण्यांसाठी शहर भाजपने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दबावामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा अखेर पुन्हा सुरू … Read more

Ration Card : पुरवठा विभागाचा मोठा निर्णय ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या नागरिकांचे रेशन होणार बंद

Ration Card : शासनाने स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक रेशनकार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते. येत्या ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १,८८७ स्वस्त धान्य दुकानांमधून २९.६६ लाख लाभार्थ्यांना धान्याचे वाटप … Read more

कारखान्याच्या गट कार्यालयात बोगस डॉक्टरचा दवाखाना!

आश्वी, १९ मार्च २०२५ – कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही राजस्थानमधील एका बोगस डॉक्टरकडून आयुर्वेदिक उपचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या आश्वी विभागीय गट कार्यालयात अवैधरित्या दवाखाना सुरु केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. इम्रान अब्दुल खान (रा. भरतपूर, राजस्थान) आणि भरत मधुकर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चिंता वाढली ! तुमचं नाव यादीत असेल तर पैसे होणार बंद

अहिल्यानगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, अशा १८ ते २० हजार महिलांची यादी परिवहन कार्यालयाने महिला व बालविकास विभागाला पाठवली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक महिलांच्या मनात चिंता निर्माण झाली … Read more