अहिल्यानगरमध्ये लग्न समारंभात हायप्रोफाईल चोरी ! सीसीटीव्हीमुळे समोर आली १९ वर्षांच्या चोरट्या तरुणीची लबाडी

अहिल्यानगरमध्ये एका लग्न समारंभात कलवरी म्हणून आलेल्या १९ वर्षीय तरुणीने तब्बल ६७ तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तिला अटक करून ५७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चोरीला गेलेले उर्वरित १० तोळे दागिने तिने एका सराफाला विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. घटना कशी उघड … Read more

Nagpur News : दगाबाज प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसी गर्भवती न्यायालयात गर्भपातासाठी अर्ज,प्रियकरावर फसवणुकीचा आरोप

नागपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. १७ वर्षीय प्रेयसीने तिच्या प्रियकरावर फसवणुकीचा आरोप केला असून, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे शारीरिक शोषण केल्याचे तिने सांगितले आहे. परिणामी, ती गर्भवती झाली. तिच्या पालकांनीही गर्भपातासाठी संमती दिली आहे, मात्र कायदेशीर अडचणींमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक ठरला आहे. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चौकशी झाली सुरु ! ‘ती’ यादी मागविली…

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्जदारांचा समावेश झाल्याचे आढळल्यानंतर आता महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांनी त्याची सखोल पडताळणी सुरू केली आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. महिलांची यादी तपासणीसाठी महसूल विभागाच्या उप प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्हा परिषदेकडे चारचाकी वाहनधारक महिलांची यादी … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : कुकडी कालवा फोडला ! शेतकऱ्यांचे अर्धनग्र आंदोलन…

कर्जत मधील रूईगव्हाण पीर फाटा परिसरामध्ये सीना धरणाकडे जाणारा कुकडीचा मुख्य कालव्याचा भराव तोडून त्यात मोठमोठे पाईप टाकून काही जणांनी फोडला. त्यामुळे सीना धरणामध्ये पाणी जाण्यास अडचण निर्माण होणार असून, भराव फोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाण्यामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. अमोल खराडे, विकास शिरसागर, विकास … Read more

ऑनलाईन सिस्टीममध्ये ‘अहिल्यानगर’ नावाची अंमलबजावणी करण्याची मागणी

१२ मार्च २०२५, अहिल्यानगर – अहमदनगरचे अधिकृत नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले असले तरी, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या ऑनलाईन प्रणालीत हे नाव बदलले गेलेले नाही. यामुळे महायुतीच्या आमदारांनी विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. नामांतर निर्णय आणि अंमलबजावणी मागील काही महिन्यांपूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अधिकृतपणे ‘अहिल्यानगर’ असे करण्यात आले. महाराष्ट्र … Read more

अहिल्यानगर हादरले ! देवमाणूसच बनला भक्षक ;डॉक्टरनेच केला भावाचा खून!

भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या व्यसनाधीन भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील सातवड गावात घडला आहे. आई आणि स्वतःच्या मुलाला वारंवार मारहाण करणाऱ्या भावाचा अखेर डॉक्टर असलेल्या भावानेच काटा काढला. पोलिस तपासात या हत्येचा उलगडा झाला असून, डॉक्टर अशोक रामराव पाठक (३९, रा. सातवड, ता. पाथर्डी) … Read more

रेशन कार्डधारकांना ; ‘लाडकी बहीण’चा फटका ; पहिल्याच अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा योजने’ला बगल !

१२ मार्च २०२५ मुंबई : महायुती सरकारची लोकप्रिय योजना ‘आनंदाचा शिधा योजना’ आता बंद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली होती. शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला राज्यातील एक कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता; पण … Read more

अहिल्यानगरच्या लाडक्या बहिणींना मिळणार साड्या ! पण करावं लागेल ‘हे’ महत्वाचं काम…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : गुढीपाडव्याला ८७ हजार ९५० लाडक्या बहिणींना साड्या मिळणार आहेत. आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे. त्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. ही शेवटची मुदतवाढ आहे. आता पर्यंत ६८ टक्केच लाभार्थ्यांनी केवायसी केली … Read more

श्रीरामपूरकरांसाठी ‘गुड न्यूज’ ! नागरिकांची ‘हि’ समस्या येणार संपुष्टात ; सुमारे ३४ किमी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे नियोजन,अशी असेल प्रस्तावित योजना

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने मार्च २०२१ मध्ये १०८ कोटींची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. त्यात वाढ होऊन पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना-दोन मधून १७८ कोटींच्या योजना मंजूर झाली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा योजना कात टाकून अत्याधुनिक होणार असल्याने श्रीरामपुरकरांना २४ तास … Read more

दमबाजी करत बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देऊन मागितली एक कोटींची खंडणी ; ‘खोक्या’च्या साडूने…

११ मार्च २०२५ पाथर्डी : बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाथर्डी येथील साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविवारी रात्री (दि. ९) गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात आजिनाथ सावळेराम खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी … Read more

स्वतःच्या घरामागेच सापडला तरुणाचा मृतदेह ; हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

११ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या संत्र्याच्या बागेत आढळून आला आहे. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असून प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे.सोमनाथ रामराव पाठक (वय ३५) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत सोमनाथ याच्या डोक्याला मार असून पाय मोडून … Read more

सामूहिक शुभमंगल योजना ; आता लग्नासाठी जोडप्यांना मिळणार अनुदान,रक्कम असेल…

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : विवाह खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडून जाते.पैशांअभावी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा आनंदाचा सोहळा अडचणीचा ठरतो.त्यामुळे सरकारची शुभमंगल विवाह योजना लाभदायी ठरत आहे. गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी त्यातून मिळत आहे. सामूहिक शुभमंगल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. त्यात वेळोवेळी अनुदानात वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक … Read more

राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ घटनेच्या फिर्यादीचा अपघाती मृत्यू ; संशयास्पद प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगाव येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे भानुदास गायकवाड यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने नवीन संशय निर्माण झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेतला जात … Read more

कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ! कर्जाची परतफेड करावीच लागणार…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याच्या अर्थसंकल्पात काही ना काही कर्जमाफीची घोषणा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. मात्र, अर्थसंकल्पात कर्जमाफी बाबत कोणतीच घोषणा केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून, कर्जाची परतफेड करावीच लागणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा … Read more

शिर्डी विमानतळासाठी मिळणार ‘एवढा’ निधी ; सुरु होणार ‘या’ नव्या सुविधा

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी एक हजार ३६७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. शिवाय लवकरच नाईट लँडिंग व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने शिर्डी व … Read more

चासमध्ये बनवली जाणार अहिल्यादेवी होळकर सृष्टी ! “स्त्री सक्षमीकरण केंद्रासह” अनेक उपक्रम…

चास (ता. नगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ 588 कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला असून, अद्याप त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. 66 एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या सृष्टीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची योजना आहे. या सृष्टीमध्ये स्त्रियांना सशक्त करण्यासाठी विशेष … Read more

दुबई मधून स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा हि बातमी वाचाच…

कन्नड अभिनेत्री रान्या रावला दुबईहून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणताना अटक करण्यात आली आहे. ती एमिरेट्सच्या विमानाने केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असताना डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अधिकाऱ्यांनी तिच्या हालचालींवर संशय घेतला. तपासानंतर 12.56 कोटी रुपये किमतीचे 14.8 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याच्या तस्करीसाठी तिने कपड्यांमध्ये सोने लपवले होते. गेल्या काही … Read more

मागील दहा हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प ! सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाला “मागील दहा हजार वर्षांतील सर्वात बोगस” असल्याचे संबोधले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ लेखक आणि व्यंगचित्रकार आचार्य अत्रे यांची आठवण काढत, “आज ते असते, तर त्यांनीही असा बोगस अर्थसंकल्प पाहिला नसल्याचे म्हटले असते”, असे विधान केले. उद्धव ठाकरे … Read more