अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू उपसा आणि विक्रीसाठी परवाना घ्यायचाय? तर वाळू लिलावासाठी आजची शेवटची तारीख, जाणून घ्या प्रक्रिया!

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  जिल्ह्यातील १२ वाळू पट्ट्यांच्या लिलावासाठी आज (दि. १० जून २०२५) हा शेवटचा दिवस आहे. महसूल मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुधारित वाळू धोरणाला ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने या वाळू पट्ट्यांचे ऑनलाइन लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या, परंतु एकाही ठेकेदाराने यात सहभाग न घेतल्याने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेळ्या वाचवताना शेतकरी गेला वाहून, तीन तासानंतर सापडला मृतदेह

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील उख्खलगाव परिसरात रविवारी (दि. ८ जून २०२५) दुपारी ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे बेद ओढ्याला पूर आला आणि यात भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर (वय ४२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अवघ्या दोन तासांत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले, गावाचा संपर्क तुटला आणि पाझर तलावाचा मातीचा भराव तुटल्याने … Read more

जिल्हा शल्यचिकित्सकांची घाईघाईत बदली, डॉ. चव्हाण यांचे मॅटमध्ये आव्हान, तर दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा दाबण्यासाठी अचानक बदली केल्याची चर्चा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक पदावरुन डॉ. नागोराव चव्हाण यांची अवघ्या सात महिन्यांत मुदतपूर्व बदली झाल्याने प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर खळबळ उडाली आहे. या बदलीला डॉ. चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले आहे. दरम्यान, डॉ. संजय घोगरे यांनी सोमवारी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून हजर होत पुन्हा पदभार स्वीकारला आहे.  या बदली … Read more

जी.एस.महानगर बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजली शेळके यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी भास्कर कवाद यांची निवड

राज्यातील सहकारी चळवळीत अग्रगण्य स्थान असलेल्या जी. एस. महानगर बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजली उदय शेळके आणि उपाध्यक्षपदी भास्कर बाबाजी कवाद यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. मुंबई येथील लालबाग येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकारी संस्था अधिकारी दीपक पाडवी यांच्या उपस्थितीत ही … Read more

पगार मागितला म्हणून हाॅटेल मालकाने आचाऱ्याला केली लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

Ahilyanagar News: राहुरी- एक महिना केलेल्या कामाचा पगार मागितला म्हणून हॉटेल मालकाने आचाऱ्याला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने व काठीने मारहाण केली. राहुरी शहर हद्दीत शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिलोक सिंग (वय ६५, रा. चितोडगड, उत्तराखंड), हल्ली रा. शुभकिर्ती हॉटेल, राहुरी बुद्रुक यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more

बनावट ॲपद्वारे शनिभक्तांची कोट्यावधींची फसवणूक, मंदिर प्रशासन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे आंदोलन

Ahilyanagar News:  सोनई- श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ॲपची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व विविध संघटनाकडून काल सोमवारी शिंगणापूर देवस्थान मंदिर परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शनिशिंगणापूरमध्ये काहींनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून तसेच बनावट देणगी पावती व बनावट ॲपच्या माध्यमातून गैरप्रकार करून हा … Read more

भंडारदरा वीकेंडला हाऊसफुल्ल! काजवा महोत्सव आणि गिर्यारोहणासाठी हजारो पर्यटकांची गर्दी

Ahilyanagar News: भंडारदरा- पर्यटनाची पंढरी महणून प्रसिद्ध असणारा भंडारदरा वीकएंडच्या सुट्टीला हाऊसफुल्ल झालेला दिसून आला. हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्यातील काजया महोत्सवाचा आनंद घेत निसर्ग सौंदर्याची अनुभुती घेतली. अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या भंडारदऱ्याला निसर्ग पर्यटनाची पंढरी म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून शनिवारी व रविवारी हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट देत निसर्ग पर्यटनाचा आनंद उपभोगला. … Read more

महसूलमंत्र्यांचे आदेश धाब्यावर! जिल्हाधिकाऱ्यांकडून राशीन मंदिर अतिक्रमण प्रकरणाकडे दुर्लक्ष?

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण, धर्मादाय आयुक्तांचा निष्काळजीपणा, भूमी अभिलेख कार्यालयाने केलेली चालढकल, याबाबत अनेकांनी आवाज उठवला होता. याची दखल महसूलमंत्री यांनी घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याकडे आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केले म्हणून या प्रकरणात आता थेट मुख्यमंत्री यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी योगेंद्र … Read more

अहिल्यानगरमधील अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात; वारं केव्हाही, कसंही फिरू शकतं- अंबादास दानवे

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- येथे नुकत्याच झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि प्रत्येक प्रभागात पोहोचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शिवसेनेला आईच्या रूपात संबोधत, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाला पुढे नेण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दोन जागा … Read more

शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच अभियंत्यानी केली सीना नदीच्या पुलाची पाहणी, काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल देऊ नका शिवसेनेची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- मागील आठवड्यामध्ये अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना घेराव घालून करण्यात आली होती. त्यानंतर आज पुणे येथून राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता यांनी शहरात सुरू असलेल्या सीना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू … Read more

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला आधार

Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील बाभळेश्वर, राजूरी, ममदापूर, तिसगाव वाडी आणि अस्तगाव परिसरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळसदृश पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे डाळींब, आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे पडून घरे आणि गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाला … Read more

क्रिकेट पाहून परत येत असतांना अहिल्यानगरजवळ क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात, २ जण ठार तर ११ जण जखमी

Ahilyanagar News: नेवासा- पुणे येथून जळगावकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भिषण अपघात होऊन त्यात बोदवड (जि. जळगाव) येथील खाजगी क्रिकेट प्रशिक्षण संस्थेतील दोन विद्यार्थी ठार झाले. तर इतर ११ जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात काल सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.  याप्रकरणी क्रिकेट प्रशिक्षक गौरव सुनील … Read more

पावसाळी अधिवेशनानंतर लगेच स्थानिक स्वराज्यसाठी निवडणुका लागणार, तयारीला लागण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

Ahilyanaghar News: अहिल्यानगर- राज्यात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला व नेतृत्वाला मोठे यश असल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकीतही भाजप सर्वत्र विजयी होणार आहे. त्यासाठी तिन्ही जिल्हाध्यक्षांनी व नव्या मंडलाध्यक्षांनी आपल्या भागाचा दौरा करून मतदारसंघ पिंजून काढावा. राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर राज्यात कधीही निवडणुका लागण्याची शक्यता असून, पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे, असे सूचक वक्तव्य जलसंपदामंत्री … Read more

अहिल्यानगरच्या बाजारात मेथी महागली! कोथिंबीर-शेपूला मिळतोय एवढा भाव?, जाणून घ्या भाजीपाल्याचे आजचे दर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची १९९१ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये १८ हजार ७० पालेभाजांच्या जुड्यांचा समावेश होता. यावेळी मेथीच्या ५०५ जुड्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी मेथी जुडीला २५ ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळाला.  कोथिंबीर जुडीला ८ ते २५ रुपयांपर्यंत भाव कोथिंबीरीच्या १७ हजार ६५ जुड्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत आंब्याची सर्वाधिक आवक, हापूसला ११ हजारापर्यंत भाव तर मोसंबीच्या दरात मोठी घसरण

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी ३७२ क्विंटल विविध फळांची आवक झाली. चार दिवसांच्या तुलनेत रविवारी फळांची आवक घटल्याचे दिसून आले. यावेळी मोसंबीला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीच्या भावात सुमारे तीन हजार रुपयांनी घसरण झाली होती.  हापूस आंब्यांना 11 हजारापर्यंत भाव डाळिंबाला २००० ते १२ हजारांपर्यंत, तर पपईला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल १५०० … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मदत करू, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नाशिक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. १५ दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने कृषिमंत्र्यांना निवेदन देत, स्वस्त दरात कांदा विक्रीचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, मंत्र्यांच्या कार्यालयासमोर कांदा ओतून आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.  कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची केली चर्चा या अनुषंगाने ना. कोकाटे यांनी बागलाण शासकीय विश्रामगृहावर शेतकरी … Read more

स्पीडबोटने जेएनपीए ते गेटवे अवघ्या २५ मिनिटांत पोहोचता येणार, मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे स्पीडबोट सेवा रखडली

जेएनपीए बंदर ते मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील वातानुकूलित स्पीडबोट सेवा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तांत्रिक अडथळ्यामुळे ही सेवा लांबणीवर पडली आहे. ही स्पीडबोट सेवा सुरू झाल्यास या जलमार्गावरील वातानुकूलित ई-स्पीडबोटमधून हा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे उरण परिसरातील प्रवाशांना या सेवेची प्रतीक्षा आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार … Read more

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार, मोरवाडी धरणाबाबत १८ जूनला मंत्रालयात बैठक- आमदार खताळ

Ahilyanagar News: संगमनेर-तालुक्यातील पठारभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोरवाडी येथे धरण व्हावे, अशी साकुर पठारभागातील जनतेची अनेक वर्षाची मागणी होती. या मागणीचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली असून १८ जून रोजी मुंबई येथील मंत्रालयामध्ये मंत्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरवाडी धरणाच्या संदर्भात जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याची माहिती आ. अमोल … Read more