शेतकऱ्यांनो ‘एक रुपया पीकविमा’ योजना सरकारने केली बंद, आता वाढीव हप्ता भरावा लागणार, जाणून घ्या सविस्तर!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये सुरू झालेली ‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेऐवजी ‘सुधारित पीकविमा योजना’ लागू करण्यात आली असून, त्यानुसार शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे.  या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार असून, नवीन निकषांमुळे … Read more

कोपरापासून हात नाहीत..! दहावीत पटकावला तिसरा क्रमांक, अहिल्यानगरमधील समीरची जिद्द…

Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील मुतखेल हे भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले गाव. या गावातील समीर विठ्ठल ईदे हा जन्मतःच अपंग. याला कोपरापासून दोन्हीही हात नाहीत. तरीही समीर आपल्या जिद्दीच्या जोरावर दहावीच्या शालांत परीक्षेत विद्यालयामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. समीर हा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलाय. वडील विठ्ठल हे थोड्याफार शेतीवरच आपला कुटुंबाचा गाडा चालवतात. … Read more

शेतकऱ्यांनो खते आणि बियाणे शासनमान्य दुकानातून खरेदी करा अन् पक्कं बिल घ्यायला विसरू नका, कृषी विभागाचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीत व्यस्त आहेत. या काळात बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी अहिल्यानगरच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शासनमान्य आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी करण्याचे आणि पक्के बिल घेण्याचे आवाहन केले आहे.  यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल आणि … Read more

अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्याला झोडपले, ओढ्या-नाल्यांना आला पूर, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात हाहाकार माजवला. जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले, घरांमध्ये पाणी शिरले, तर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, तर मंगळवारपासून गुरुवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे … Read more

बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य पराभवाच्या वैफल्यातून, आमदार अमोल खताळ यांची जोरदार टीका

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यात गेली ४० वर्षे असलेली दहशत सामान्य जनतेने मोडून काढली आहे. या जनतेने एका सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत सेवा करण्याची संधी दिली, ज्यामुळे तालुका आणि शहरात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘संगमनेरात दहशत वाढली’ असे जर कोणाला वाटत असेल, तर ते विधान वैफल्यातून आले आहे, अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी … Read more

अहिल्यानगरमध्ये रानडुक्कर आणि सश्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ; बिबटे, तरस आणि कोल्ह्यांचा मुक्त संचार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- नगर तालुका निसर्गसौंदर्याने आणि जैवविविधतेने नटलेला आहे. येथील जंगलांमध्ये रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढली आहे, तर सशांची संख्याही लक्षणीय असल्याचे वन विभागाच्या ताज्या पाहणीत दिसून आले. बिबटे आणि तरस यांचे पदमार्ग आढळले असून, विविध पक्षी आणि प्राण्यांचा मुक्त संचार येथे पाहायला मिळतो. गर्भगिरीच्या डोंगररांगा, औषधी वनस्पती आणि कृत्रिम पाणवठ्यांमुळे हे जंगल वन्यप्राण्यांसाठी नंदनवन … Read more

अहिल्यानगरमधील आठ साखर कारखान्यांना मिळालं तब्बल १ हजार ४ कोटी रूपयांचं कर्ज, कोणत्या कारखान्याला किती कोटी मिळाले? वाचा सविस्तर!

Ahilyanagar News : अहिल्यानगर : जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांना तब्बल ११०४ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामुळे कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन सुधारले असून, शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.मागील काही वर्षांपासून हे कारखाने आर्थिक अडचणींना सामोरे जात होते. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यापासून या कारखान्यांना पुन्हा उभारी मिळताना दिसत आहे. … Read more

शेतकऱ्यांना खताच्या नावाखाली औषधं खरेदीसाठी सक्ती केल्यास दुकानदारावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचा इशारा!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शुक्रवारी (१६ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. युरिया खताच्या खरेदीसोबत पर्यायी खते किंवा औषधे घेण्याची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवण्यासाठी डमी ग्राहक पाठवून तपासणी करा, असे त्यांनी कृषी … Read more

तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागेसाठी ५६ उमेदवार मैदानात, कर्डिले-विखे गट ठरणार किंगमेकर?

Ahilyanagar News : राहुरी- येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आता रंगत आली आहे. २१ जागांसाठी शुक्रवारी (१६ मे) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १७२ पैकी ११६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती, पण ती आता खोटी ठरली आहे.  या निवडणुकीत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ २७ गावांचे पाणी आढळले दूषित, आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील २७ गावांतील पिण्याच्या पाण्याचे ३८ नमुने दूषित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढला असून, पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: अकोले तालुक्यातील २० पाणी नमुने दूषित आढळले असून, इतर तालुक्यांमध्येही काही गावांत पाण्याची गुणवत्ता चिंताजनक आहे.  ब्लिचिंग पावडरमधील क्लोरीनचे प्रमाण कमी … Read more

पाथर्डी तालुक्यात वादळ आणि पावसाचा हाहाकार! फळबांगाना मोठा तडाखा तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी-  तालुक्यात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. शहरासह मोहरी, मोहटादेवी, करोडी, कारेगाव, माणिकदौंडी, जाटदेवळा, सुरसवाडी, शिंदेवाडी, पिरेवाडी आणि आठरवाडी या भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी सायंकाळी सरींच्या स्वरूपात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर! २४५ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, २४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये फळबागा आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे. कांदा, आंबा, डाळिंब, मोसंबी, चिक्कू, मका, मिरची, केळी … Read more

अहिल्यानगरमधील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला अखेेर सुरूवात, खासदार निलेश लंके आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील निंबळक येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला होता. या पुलाच्या अभावामुळे स्थानिक नागरिकांना आणि एमआयडीसी परिसरातील रहदारीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेषत: युवा उद्योजक अजय लामखडे यांनी … Read more

अहिल्यानगरमधील आगामी निवडणुकीत अजित पवारांची ताकद चालणार का? शरद पवारांचा अनुभव सरस ठरणार? राष्ट्रवादीत कोण आहे पाॅवरफुल!

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या चार महिन्यांत सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये कार्यकर्ते आणि नेते विभागले गेले आहेत. दोन्ही गटांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, बैठका, संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव यावर … Read more

अहिल्यानगर महापालिकेत नवीन प्रभाग वाढणार? प्रभाग फेररचनेमुळे विद्यमान नगरसेवकांची धास्ती वाढली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने फेरप्रभाग रचनेचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेची प्रभागरचना नव्याने होणार आहे. ही रचना कशी असेल, प्रभागांची संख्या वाढणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या या घडामोडींमुळे राजकीय … Read more

अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे वाढला कल, जिल्ह्यात ४ हजार ७०० एकर क्षेत्रावर पिकतंय विषमुक्त अन्नधान्य

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे वाढता कल दिसून येत आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याऐवजी शेतकरी आता पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत. या योजनेंतर्गत ४ हजार ७५० शेतकऱ्यांनी ४ हजार ७०० एकर क्षेत्रावर विषमुक्त अन्नधान्य उत्पादनाचा संकल्प केला आहे.  ९४ शेतकरी गटांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, शेतकऱ्यांना … Read more

कोल्हापूरच्या कारागिराने बनवली खिशात मावणारी अवघ्या २० ग्रॅम वजनाची जगातील एकमेव चप्पल

कोल्हापुरी चप्पल म्हणजे केवळ पादत्राण नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि हस्तकलेच्या वारसाचा एक अभिमानास्पद नमुना. आपल्या नक्षीदार डिझाइन, रुबाबदार लूक आणि टिकाऊपणामुळे ही चप्पल जगभरात प्रसिद्ध आहे. पण कोल्हापूरच्या मडिलगे बुद्रुक गावातील चव्हाण बंधूंनी या चप्पलला एका नव्या उंचीवर नेलं आहे. त्यांनी बनवलेली खिशात मावणारी कोल्हापुरी चप्पल ही जगात एकमेव अशी किमया आहे, जी अवघ्या … Read more

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, कठोर कारवाई करण्याचा आमदार कर्डिले यांचा इशारा!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आणि टंचाईच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार काशिनाथ दाते यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कर्डिले यांनी शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. खते आणि बियाणांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा … Read more