AMC News : कापड बाजार, शहाजी रोड, गंज बाजारसह संपूर्ण बाजारपेठेत अतिक्रमणांवर कारवाई सुरू

AMC News : अहिल्यानगर शहरात स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पोलिस प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील रहस्यमय बेपत्ता प्रकरण 48 तासांत पोलिसांनी महिला शोधून काढली!

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एका विवाहित महिलेच्या बेपत्ताच्या घटनेने गावात मोठी खळबळ उडवली. सदर महिला गाईसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. मात्र, संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तिथे तिच्या वस्त्रांचे काही तुकडे, गवत कापण्याचा विळा, मोबाईलचे कव्हर, बांगड्यांचे तुकडे आणि मंगळसूत्र सापडले. विशेष म्हणजे, त्या विळ्यावर रक्ताचे … Read more

संगमनेर साखर कारखाना निवडणूक : ही लढाई जिंकायचीच ! आमदार खताळांचा निर्धार

संगमनेर सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचा मालकीचा असून, सध्या काही जण त्याचा कारभार खासगी मालमत्तेप्रमाणे चालवत असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. सभासदांच्या बैठकीत त्यांनी या परिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात आणण्यासाठी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याची घोषणा केली. ऊस उत्पादकांसाठी निर्णायक निवडणूक आमदार खताळ यांनी स्पष्ट … Read more

राहुरी शहरात दंगल घडवण्याचा कट दोन महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप, प्रशासनास निवेदन

राहुरी: शहरात मागील दोन महिन्यांपासून दंगल घडवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही संघटनांकडून प्रशासनावर दबाव टाकून आणि खोटी माहिती पसरवून हिंदू तरुणांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा बुवासिंद बाबा तरुण मित्रमंडळाने केला आहे. २६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. या घटनेमुळे शहरात मोठा तणाव … Read more

अहिल्यानगरमध्ये जमीन किंवा घर घ्यायचे स्वप्न पाहताय? तर नव्या रेडीरेकनरप्रमाणे मोजावे लागणार एवढै पैसै?

अहिल्यानगर: जर तुम्ही अहिल्यानगरमध्ये घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नोंदणी शुल्क विभागाने १ एप्रिलपासून जाहीर केलेल्या नव्या रेडीरेकनर दरांनुसार तुमच्यावर अतिरिक्त खर्च येणार आहे. या नव्या दरवाढीनंतर महापालिका तसेच ग्रामीण भागातील मालमत्ता खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका क्षेत्रात दोन वर्षांनंतर प्रथमच रेडीरेकनर दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार … Read more

Interesting Facts : कूलरला मराठीत काय म्हणतात ? तुमच्या कूलरचे अस्सल मराठी नाव काय जाणून घ्या अनोखी माहिती

Interesting Facts About Cooler : उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामध्ये कूलर हा एक स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जातो. घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. गरम आणि कोरड्या हवामानात कूलर अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे त्याच्या कार्यप्रणालीबद्दल आणि उपयोगांविषयी अधिक सविस्तर माहिती घेऊया. कूलर हा उन्हाळ्यात उष्णतेपासून … Read more

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : मुलगी जन्माला आली की मिळणार दहा हजार रुपये ! महाराष्ट्रात श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ लवकरच राबविण्यात येणार असून, या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणि ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. त्याच … Read more

विजेच्या लपंडावाने सावेडी, केडगावातील नागरिक हैराण; जास्त वीज पुरवठा वाढल्यामुळे होतेय वीज खंडीत

अहिल्यानगर- गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रोज तीन-चार वेळा वीज गायब होत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सावेडी आणि केडगावसारख्या मोठ्या उपनगरांमध्ये हा प्रकार अधिकच तीव्र झाला आहे. वाढत्या उष्म्यासोबतच विजेची ही अनियमितता नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. सावेडीत आणि केडगावात दररोज दोन-तीन वेळा … Read more

सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

शिर्डी – राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना सुरूच राहतील आणि कोणतीही जनहिताची योजना बंद केली जाणार नाही, असा स्पष्ट दिलासा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. शेतकरी कर्जमाफीचा विषय महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुढीपाडवा आणि नवसंवत्सरच्या मुहूर्तावर लोणी बुद्रुक येथील श्री मारुती मंदिरात पारंपरिक ग्रामसभा पार पडली. … Read more

अकोले तालुक्यात चक्क जमिनीची झाली चोरी, शेतकऱ्याची तहसिलदाराकडे तक्रार

अकोले- तालुक्यातील धामणगाव आवारी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोरपडवाडी शिवारातील शेतकरी चंद्रभान रामभाऊ गावंडे यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा उताऱ्यावरून अचानक गायब झाला आहे. स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीचा कोणताही ठावठिकाणा न सापडल्याने गावंडे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. गावंडे यांच्या मालकीची सर्वे नंबर १३, गट क्रमांक २/१ ही जमीन त्यांच्या कुटुंबाचा … Read more

विषारी औषध टाकून घोड धरणामध्ये मासेमारी, प्रकल्प व्यवस्थापकाची पोलिसांत तक्रार

बेलवंडी- श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घोड जलाशयात काही लोकांनी विषारी औषधे आणि केमिकल टाकून मासेमारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार घोड धरणाचे व्यवस्थापक शांताराम शितोळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदा मासेमारीवर तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. … Read more

जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी आमदार विठ्ठल लंघे यांचे सरकारला आवाहन

नेवासा- तालुक्यातील जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाला आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत वाचा फोडली. सरकारने अत्यंत कमी किमतीत जमिनी घेऊनही या प्रकल्पग्रस्तांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. या लोकांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी थेट राज्य सरकारला आवाहन केले आहे. आमदार लंघे यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तर तासात हा मुद्दा उपस्थित करताना प्रकल्पग्रस्तांच्या दुरवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने … Read more

शिर्डी डिफेन्स क्लस्टरमुळे हजारोंना रोजगार ! शिर्डीतून थेट लष्करासाठी सामग्री तयार होणार

शिर्डी — साईबाबांच्या पावन भूमीत — केवळ श्रद्धेचा केंद्रबिंदू राहिलेला नाही, तर आता ती औद्योगिक आणि संरक्षण उत्पादनाच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. हा प्रकल्प केवळ संरक्षण सामग्री निर्मितीपुरता मर्यादित न राहता, परिसरातील सामाजिक, आर्थिक आणि रोजगाराच्या … Read more

अहिल्यानगरकरांनो डोळ्याची तपासणी वेळेतच करा नाहीतर येऊ शकतं अंधत्व, जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांत ३६०९ जणांनी केली डोळ्यांची तपासणी

अहिल्यानगर- जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून डोळ्यांच्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळतोय. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तब्बल तीन हजारांहून अधिक लोकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यातून अनेकांना मोतीबिंदूसारख्या आजाराचं निदान झालं आहे. डोळ्यांच्या समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या तपासणीमुळे डोळ्यांचे आजार लवकर … Read more

अहिल्यानगरमध्ये उद्या या मंदिरामध्ये भाविकांसाठी राहणार दीड हजार किलो आंब्यांचा रसाचा महाप्रसाद

अहिल्यानगर- आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानात येत्या रविवारी (ता. ३०) एक खास मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी होणाऱ्या अन्नदानात दीड हजार किलो आंब्यांचा रस भाविकांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी आधीच आंब्यांची खरेदी झाली असून, भाविकांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी महाप्रसादात आमरसाची मेजवानी दिली जाते. पण यंदा … Read more

राहुरीमध्ये ३२ वर्षीय महिलेला बिबट्याने नेले ओढून?, वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू

राहुरी- तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी, अशी शंका ग्रामस्थांना आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेत होते, पण ती कुठेच सापडली नाही. या घटनेमुळे परिसरात चिंता आणि … Read more

अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यातील पाणी प्रश्न पेटला, तलाव आणि विहिरीवरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोेडले

जामखेड- तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. खैरी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील अकरा तलावांमधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलं आहे. त्यामुळे शेतीसाठी तलावातून पाणी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर … Read more

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील ‘हे’देवस्थान देणार भाविकांना प्रसाद म्हणून ‘आमरसाची मेजवानी’

अहिल्यानगर: जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथ देवस्थान कडून दर रविवारी भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद देण्यात येतो. या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र येत्या रविवारी केल्या जाणाऱ्या अन्नदानात चक्क आंब्याच्या रसाची मेजवाणी भाविकांना मिळणार आहे. यासाठी दीड हजार किलो आंब्यांची खरेदी करण्यात आली … Read more