लाडक्या बहिणीसह इतर योजना सुरूच राहतील : एकनाथ शिंदे

७ फेब्रुवारी २०२५ नांदेड : लोकसभेत ठाकरे गटापेक्षा आमच्या शिवसेनेला २ लाख, तर विधानसभेत १५ लाख जास्त मते मिळाली. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आणि खरी शिवसेना कोण हे मतदारांनी निवडणुकीत दाखवून दिले आहे. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना तसेच इतर जनकल्याणकारी योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत, अशी … Read more

एसटीचा प्रवास महागला ; सुरक्षिततेचे काय ?

७ फेब्रुवारी २०२५ पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी शुल्कात वाढ करण्यात आल्याने सामान्य प्रवाशांचा प्रवास महागला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांतील अपघातांची संख्या पाहता प्रवासी असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागांतर्गत मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत तब्बल ३०१ अपघात झाले असून, ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांच्या तुलनेत गंभीर … Read more

कॉपी कराल तर फसाल ; सावधान ! विद्यार्थ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हा

७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी कराल तर फसाल, थेट फौजदारी गुन्हाच दाखल केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा … Read more

शिर्डी साई संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेत झाला ‘असा’ बदल

७ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात मोफत भोजन घेण्यासाठी आता दर्शन घेतल्यानंतरच टोकन मिळणार आहे. मंदिराच्या उदी-प्रसाद काउंटरजवळ भाविकांना हे टोकन दिले जाणार असून, या व्यवस्थेसह काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. याबाबत पत्रकारांना माहिती देताना गाडीलकर यांनी सांगितले, की ही सुविधा केवळ साईभक्त … Read more

अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्करोग तपासणी मोहीम सुरू

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर शहरात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. ४ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार पासून शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन, तसेच आरोग्य केंद्रात आढळणारे संशयित कॅन्सर रुग्ण शोधून त्यांना पुढील उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवणार आहेत.नागरिकांनी या … Read more

दुहेरी खून सत्राने शिर्डी हादरली ; साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या

४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शिर्डीत एकाच रात्रीत हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा खून झाला,तर शहरातील एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे.जखमीवर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या प्रकारामुळे शिर्डी हादरून गेली असून संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी काही तासातच एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले,तर दुसरा आरोपीही … Read more

बोला मराठी, लिहा मराठी ! केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये आता ‘मराठी’ अनिवार्य

४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : आता राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनाही मराठीतच बोलावे लागणार आहे.मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने हे महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे.त्यानुसार सर्व केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे अनिर्वाय आहे.मराठीत न बोलणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोषी आढळल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. काय सांगते परिपत्रक प्रत्येक सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत फलक लावला … Read more

खरं तर पैलवान राक्षेने पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे होत्या ! पंचांच्या पाच सेकंदांच्या चुकीने आयुष्य उद्ध्वस्त ; डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उद्विग्नता

४ फेब्रुवारी २०२५ तासगाव : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे याच्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थितीच आहे.या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवराजने त्याच्या आयुष्यातील २० वर्षे देऊन मेहनत केली,मात्र पंचांच्या पाच सेकंदांच्या चुकीने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.दोन वेळा महाराष्ट्र केसरी असणारा शिवराज तिसऱ्या वेळी जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर तो पोलीस उपअधीक्षक झाला असता. त्यामुळे रागाच्या … Read more

खरी शिवसेना शिंदेंची असल्याचे निवडणुकीतून स्पष्ट ! विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य

४ फेब्रुवारी २०२५ नाशिक : खरी शिवसेना कुणाची हे आता सांगण्याची गरज नाही.कारण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या मतांचा कौल पाहता खरी शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे,असे मत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.सोमवारी गोऱ्हे नाशिक दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, … Read more

निवडणुकीपूर्वी मुंडे, कराड भेटले ! जरांगेंनी कथन केली घटना ; हार्वेस्टरचा विषय काढताच कराडने काढला पाय

४ फेब्रुवारी २०२५ छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच जण अंतरवालीला येऊन भेटत होते.त्यावेळी धनंजय मुंडे हे सुद्धा येऊन भेटले होते.लक्ष राहू द्या, अशी विनंती त्यांनी केली होती,त्यावेळी त्यांच्या सोबत कराडही होता. मुंडे यांनीच त्याची ओळख करून दिली होती, त्यावर ‘ह्यो आहे का तो हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा,’ असे मी त्याला पाहून म्हणालो होतो. हे … Read more

विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांमागे अनेक खलनायक : खा. संजय राऊत यांची महायुतीवर पुन्हा टीका

४ फेब्रुवारी २०२५ नाशिक : विधानसभा निवडणुकीत शेवटच्या एक-दीड तासात झालेल्या मतदानाविषयी आता उच्च न्यायालयानेच निवडणूक आयोगाकडे खुलासा मागवल्याने निवडणुकीत झालेल्या अनेक प्रकारांवर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे आता न्यायालयाने या प्रकाराबाबत शेवटपर्यंत जायला हवे. त्याशिवाय लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकणार नाही,असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी केले.खा. राऊत सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी … Read more

राजूरच्या अपर तहसीलचा आदिवासी भागासाठी फायदा : नागरिकांना मिळणार दिलासा

४ फेब्रुवारी २०२५ राजूर : अकोले तालुक्यातील राजूर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव असून,हा निर्णय तालुक्याच्या विभाजनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.या निर्णयामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या टोकाला असलेला अकोले तालुका सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. एक लाख ५० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या … Read more

नोटांचा पाऊस पाडण्याचे स्वप्न दाखवून लुटणारी टोळी अजूनही सक्रिय

४ फेब्रुवारी २०२५ अकोला : तंत्रविद्येने नोटांचा पाऊस पाडण्याचे स्वप्न दाखवून लूटणारी टोळी अकोला जिल्ह्यात अजूनही कायम आहे. यातूनच एकेकाळी अकोला शहरात समाजवादी पार्टीचे नेते मुकीम अहेमद यांची हत्या झाली होती. त्यानंतर पातूरच्या जंगलात रहेमत खान हामिद खान नामक व्यक्तीचा हकनाक बळी गेला. नोटांचा पाऊस पाडून देणे किंवा भूमिगत धन काढून देण्याच्या नावाखाली आजवर अनेकांची … Read more

Income Tax 2025 : पगार असणाऱ्या लोकांना किती टॅक्स भरावा लागणार ?

आर्थिक वर्ष 2025 साठी भारत सरकारने पगारदार नागरिकांसाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पगारदार लोकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यातच एक विशेष घोषणा केली आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल, तर त्यांना आयकर भरण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे लाखो पगारदार नागरिकांना मोठा फायदा … Read more

होंडाने आणली स्टायलिश नवीन सिटी अॅपेक्स एडिशन

४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आपले लोकप्रिय मॉडेल होंडा सिटीची नवीन अॅपेक्स एडिशन लाँच केली आहे.मर्यादित आकारमानामध्ये उपलब्ध अॅपेक्स एडिशन मॅन्युअल ट्रान्समिशन (एमटी) व कंटिन्युअस्ली व्हेरिएबल ट्रान्समिशन (सीव्हीटी) मध्ये ऑफर करण्यात येईल आणि होंडा सिटीच्या व्ही व व्हीएक्स श्रेणीवर आधारित आहे. देशामध्ये सर्वाधिक … Read more

शिर्डी मतदार संघाबाबत केलेल्या विधानावर मंत्री विखे पाटील यांची टीका : शिर्डीच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय योजण्याचे आदेश

४ फेब्रुवारी २०२५ राहाता : “कोणतेही विधान करताना खासदार राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहिजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठून लावला ? हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते चुकीची विधाने करून जनते समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. खासदार राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार संघाबाबत … Read more

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांमुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात : सोनवणे

४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वाढती व्यसनाधीनता तरुणाईच्या मुळावर उठली आहे.भारतात गुटखा व तंबाखु जन्य पदार्थांमुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात तंबाखू जन्य पदार्थ सेवन करणाऱ्या सुमारे ५० टक्के लोकांना कॅन्सर, हृदयविकार किंवा श्वसनासारख्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची भिती कॅन्सरतज्ञ डॉ. सतिश सोनवणे यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर ४ फेब्रुवारी … Read more

‘पाणी अडवण्यासाठी ५० हजार कोटी खर्च करणार’

४ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : शहरातील अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात आ. मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ना. विखे बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, अॅड. अंकुशराव गर्जे, भीमराव फुंदे, दिलीप भालसिंग रणजीत बेळगे, कचरू … Read more