Upcoming SUV Cars : पैसे तयार ठेवा! फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहेत ‘या’ 3 नवीन SUV कार्स!

Content Team
Published:
Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय ग्राहकांमध्ये फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कार आहे.  फोर्ड एंडेव्हर भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडल्यानंतर, टोयोटा फॉर्च्युनरने या सेगमेंटवर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे.

दरम्यान, अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड लवकरच भारतीय बाजारात कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी 2024 मध्ये अनेक नवीन SUV लाँच होणार आहेत. यात एमजी मोटर, स्कोडा आणि जीप सारख्या कंपन्या आहेत. आगामी काळात लॉन्च होणाऱ्या या 3 SUV बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Jeep Meridian Facelift

जीप मेरिडियन ही कंपनीची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही आहे. कंपनी चालू कॅलेंडरमध्ये म्हणजेच 2024 मध्ये त्याचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आगामी जीप मेरिडियनच्या आतील भागात, ग्राहकांना 12.3-इंच स्क्रीन, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय कारमध्ये सुरक्षेसाठी 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS देण्यात आला आहे.

MG Gloster Facelift

एमजी मोटर गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. अलीकडेच एमजी मोटरने जेएसडब्ल्यू समूहासोबत करार केला आहे. आता कंपनी आपल्या लोकप्रिय SUV MG Gloster ची फेसलिफ्ट आवृत्ती 2024 मध्ये लॉन्च करणार आहे. आगामी SUV मध्ये, ग्राहकांना पोर्ट्रेट स्टाइल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, सुरक्षिततेसाठी 360-डिग्री सराउंड कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान देखील मिळेल.

New-Gen Skoda Kodiaq

ऑटो क्षेत्रातील आघाडीची कार उत्पादक स्कोडा आपल्या लोकप्रिय एसयूव्ही कोडियाकची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अलिकडच्या महिन्यांमध्ये Skoda Kodiaq ची भारतीय बाजारात अपेक्षेनुसार विक्री होत नाही. तथापि, आता कंपनीला सुधारित आवृत्तीकडून चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. ग्राहकांना अपडेटेड स्कोडा कोडियाकमध्ये लेव्हल-2 एडीएएस तंत्रज्ञान देखील मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe