Top CNG Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना पेट्रोल-डिझेलवरील कार वापरने परवडत नाही. मात्र ऑटो मार्केटमध्ये दमदार मायलेज देणाऱ्या स्वस्त CNG कार देखील उपलब्ध आहेत.
CNG कार पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे. तुम्हालाही देखील स्वस्त CNG कार खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक कंपन्यांच्या स्वस्त CNG कार उपलब्ध आहेत.
मारुती सेलेरियो सीएनजी
मारुती सुझुकीकडून त्यांच्या सर्वाधिक CNG कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केलेल्या आहेत. सध्या CNG कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचे चांगले वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीची सेलेरियो CNG कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
ही कार 35.60 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. मारुती सुझुकीकडून त्यांच्या Celerio CNG कारमध्ये कंपनी फिटेड CNG किट देण्यात येत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.69 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती WagonR CNG
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या WagonR कारमध्ये देखील कंपनी फिटेड CNG किट देण्यात येत आहे. एका किलो CNG मध्ये ही कार 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.42 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. WagonR हॅचबॅक कार तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे. तसेच कारची किंमत देखील कमी असल्याने कमी बजेट ग्राहकांसाठी WagonR CNG कारचा उत्तम पर्याय आहे.
मारुती अल्टो सीएनजी
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची अल्टो CNG कार देखील कमी बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. अल्टो सीएनजी कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.03 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 31.59 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. अल्टो सीएनजी कारमध्ये 800cc इंजिन पर्याय देण्यात येणार आहे.
मारुती S-Presso CNG
मारुती सुझुकीकडून त्यांच्या S-Presso हॅचबॅक कारमध्ये देखील कंपनी फिटेड CNG पर्याय देण्यात आला आहे. ही हॅचबॅक कार एका किलो CNG मध्ये 31.2 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारच्या CNG मॉडेलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.38 लाख रुपये आहे.
टाटा टियागो सीएनजी
टाटा मोटर्सकडून त्यांच्या टियागो कारमध्ये देखील CNG पर्याय देण्यात आला आहे. तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी टियागो 5 सीटर कार उत्तम पर्याय आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.10 लाख रुपये आहे. ही कार 26 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.