चाळीस वर्षाची स्त्री पुरुषांसोबत करू पाहते ‘या’ 5 गोष्टी, परंतु अनेक पुरुषांना देता येत नाही साथ

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : नेहमी असं म्हटलं जात की, स्त्रियांना समजून घेणे फार कठीण आहे. कारण त्यांचे बोलणे, चालणे समजून घेणे फार अवघड. त्यांना कधी काय हवंय नको ते काही कळत नाही. एका विशिष्ट वयानंतर, प्रत्येक पत्नीला तिच्या पतीकडून काही गोष्टींची इच्छा असते आणि जर तिला त्या मिळाल्या नाहीत,

तर नातेसंबंधातील तुमचे एफर्ट काही कामाचे राहत नाहीत. माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याची विचारसरणीही बदलते आणि तो प्रगल्भही होतो. याच कारणामुळे जेव्हा एखादी महिला ४० वर्षांची होते, तेव्हा तिचा पतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. चला तर मग जाणून घेऊया वयाच्या चाळीशीनंतर महिला आपल्या जीवनसाथीमध्ये काय शोधतात.

1. खोटी प्रशंसा करणे टाळा

प्रत्येक स्त्रीला प्रशंसा आवडते पण ती खरी असावी. ती नेहमी चांगली दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी प्रयत्न करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तिला कॉम्प्लीमेंट द्यायची असेल तर ती काळजीपूर्वक द्या, कारण तिला तिच्या स्व बद्दल पूर्ण जाणीव झालेली असते. त्यामुळे त्यांच्याशी 20 किंवा 30 वर्षांच्या मुलीसारखे वागू नका. त्यांची मॅच्युरिटी लक्षात ठेवा.

2. गेम प्लेयर बनू नका

जर तुम्ही 40 वर्षांचे पुरुष असाल आणि शारीरिक अटॅचमेंट च्या मूडमध्ये असाल, तर कदाचित तुमच्या प्राधान्यक्रमांची क्रमवारी बदलण्याची वेळ आली आहे. 40 वर्षांच्या महिलेकडे आता त्यासाठी तेवढा वेळ नाही. तिला माहित आहे की तिला काय हवे आहे आणि जर तुम्ही शरीर आणि आत्म्याने तिचे बनू शकत नसाल तर मात्र तुमच्यात बिनसु शकते.

3. क्वालिटी

40 वर्षांच्या महिलेशी बोलत असताना, तुम्हाला तुमच्या संभाषणाची पातळी वाढवायला हवी. तुमचा परिधान केलेला छान सूट किंवा तुमचे मनमोहक स्मित तिचे लक्ष वेधून घेईल, परंतु ती तुमची संवेदनशीलता, तुमची करुणा आणि तुमची मानवी मूल्ये असेल जी तिचे मन जिंकेल. वयाच्या 40 व्या वर्षी महिलांना चांगले दिसणारे नव्हे तर चांगले चारित्र्य असलेली व्यक्ती आवडते.

4. विश्वासू

एका 40 वर्षांच्या स्त्रीला एक असा माणूस हवा असतो जो तिला आहे तसा स्वीकारेल. एक असं जोडीदार जो तिच्या पाठीशी उभा राहू शकेल आणि त्याच्यासोबत जग जिंकू शकेल.

5. आदर

आदर हा कोणत्याही नात्यात आणि प्रत्येक वयात असला पाहिजे. जेव्हा एखादी स्त्री 40 वर्षांची असते तेव्हा ती इतरांचा आदर करण्यास आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यास शिकते. ती जोडीदारातही तेच शोधते. आदर फील करणे म्हणजे सुरक्षितता फील करणे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe