Mahindra Thar Price Hiked : महिंद्राकडून ग्राहकांना मोठा झटका ! थारच्या किमतीत केली मोठी वाढ, पहा नवीन किमती

Mahindra Thar Price Hiked : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता थार एसयूव्ही खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे. नवीन थार एसयूव्ही कार खरेदीदारांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून डिसेंबर 2023 मध्ये कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ-एन आणि बोलेरो आणि थार एसयूव्हीच्या किमतीत वाढ केली आहे.

महिंद्रा थार नवीन किंमत

महिंद्रा कार कंपनीकडून थार एसयूव्हीच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. थारच्या टॉप व्हेरिएंट AX (O) हार्ड-टॉप डिझेल MT 4WD ची किंमत सुमारे 34,699 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच बेस व्हेरिएंट एंट्री-लेव्हल LX हार्ड-टॉप पेट्रोल AT RWD ची किंमत 22,899 रुपयांनी वाढवली आहे.

त्यामुळे आता बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.98 लाख रुपये झाली आहे तर टॉप व्हेरिएंट LX हार्ड-टॉप डिझेल AT 4WD ची एक्स शोरूम किंमत 14 लाख रुपये झाली आहे. थार एसयूव्ही कार एव्हरेस्ट व्हाइट (नवीन), ब्लेझिंग ब्रॉन्झ (नवीन), एक्वामेरीन, रेड रेज, नेपोली ब्लॅक आणि गॅलेक्सी ग्रे या रंग पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

महिंद्रा थार इंजिन आणि ट्रान्समिशन

महिंद्राकडून त्यांच्या थार एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय दिले आहेत. पहिले 2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 150 PS पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दुसरे इंजिन 2.2-लिटर डिझेल इंजिन दिले आहे जे 130 PS पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तसेच कारमध्ये तिसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे जे 118 PS पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारचे डिझेल मॅन्युअल व्हेरियंट 15.2 kmpl, डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट 9 kmpl, पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट 15.2 kmpl आणि पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट 9.16 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

महिंद्र थार वैशिष्ट्ये

ऑफ रोडर थार एसयूव्ही कारमध्ये LED DRL सह हॅलोजन हेडलॅम्प, 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो AC, क्रूझ कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये डिजिटल MID अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच थार कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर असे मानक फीचर्स देण्यात आले आहेत. थार कार मारुती जिमनी आणि फोर्स गुरखा एसयूव्हीशी स्पर्धा करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe