इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी! ॲमेझॉन सेलमध्ये ‘या’ तीन इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहेत अर्ध्या किमतीत; मिळेल तब्बल 54 टक्क्यांची सूट

ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या दृष्टिकोनातून बघितले तर या प्लॅटफॉर्मवर सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर वर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. तुम्ही या माध्यमातून इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी केली तर यावर 50% पर्यंत सूट दिली जात आहे.

Ajay Patil
Published:
amazon sale

सणासुदीच्या कालावधीमध्ये फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून फेस्टिवल सेलचे आयोजन करण्यात आले आहे व या सेलमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या व महागड्या वस्तू खरेदी केल्या तर त्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.

इतकेच नाही तर तुम्ही या सेलच्या माध्यमातून बाईक देखील खरेदी करू शकणार आहात. या अनुषंगाने जर ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या दृष्टिकोनातून बघितले तर या प्लॅटफॉर्मवर सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर वर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

तुम्ही या माध्यमातून इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी केली तर यावर 50% पर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे या लेखात आपण अशा तीन इलेक्ट्रिक स्कूटर बघणार आहोत की त्यावर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 54 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. म्हणजेच या इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला अर्ध्या किमतीत खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

 या इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे 54% पर्यंत सूट

1-EOX E1 इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला जर ही इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर ॲमेझॉनवर ही स्कूटर एक लाख तीस हजार रुपयांच्या किमतीसह लिस्टेड आहे. परंतु या इलेक्ट्रिक स्कूटरवर सध्या 54 टक्क्यांची सूट उपलब्ध असल्याने तुम्ही ती 59999 खरेदी करू शकतात.दुसरे महत्त्वाचे म्हणजे 2938 रुपयांच्या मासिक ईएमआय वर देखील खरेदी केली जाऊ शकते.

ही स्कूटर एका चार्जवर साधारणपणे 80 किलोमीटरची रेंज देते व यामध्ये 250 वॅटची बीएलडीसी मोटर आणि 32AH 60V बॅटरी देण्यात आलेली आहे व या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे. विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आरटीओ नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

2- ग्रीन फ्लाईंग इलेक्ट्रिक स्कूटर ही इलेक्ट्रिक स्कूटर ॲमेझॉनवर 69 हजार रुपयांच्या किमती सह लिस्ट असून या स्कूटरवर 51 टक्क्यांची सूट दिली जात आहे. त्यामुळे ही स्कूटर तुम्हाला 33 हजार 999 खरेदी करू शकणार आहात. इतकेच नाहीतर 16665 रुपयांच्या ईएमआयवर देखील ही खरेदी करता येईल.

ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 60 किलोमीटरची रेंज देते. यामध्ये 250 वॅटची मोटर देण्यात आलेली आहे व या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतीतास आहे. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते सहा तासांचा कालावधी लागतो व विशेष म्हणजे या स्कूटरसाठी आरटीओ नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

3- कोमाकी X-ONE स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटर amazon वर 49 हजार 999 च्या किमतीसह लिस्टेड आहे. मात्र सध्या या स्कूटरवर 24% सूट मिळत असल्याने ती तुम्ही 37 हजार 799 रुपयांना खरेदी करता येणार आहे. इतकेच नाही तर १८५१ रुपयांच्या मासिक ईएमआय वर देखील तुम्ही तिला खरेदी करू शकतात.

ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 25 किलोमीटरची रेंज देते व तिचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास इतका आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी देखील आरटीओ नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe