चीन मधील प्रसिद्ध कार कंपनी BYD ने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Atto 3 ची फेसलिफ्टेड आवृत्ती लॉन्च करणार आहे. या नवीन EV मध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) सह अनेक महत्वाचे अपडेट केले आहेत, ज्यामुळे कार अधिक सुरक्षित झाली आहे. इंटीरियरबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी, कारच्या बाहेरील भागात अनेक बदल दिसून येत आहेत. या नवीन मॉडेलमध्ये काय खास आहे, याची सविस्तर माहिती घेऊया.
गाडी अधिक स्टायलिश
BYD Atto 3 फेसलिफ्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नवीन 18-इंच अलॉय व्हील्स या गाडीला अधिक स्पोर्टी लूक देतात. तसेच, डी-पिलरवर ब्लॅक ट्रीटमेंट दिली गेली आहे, जे SUV च्या स्टाइलमध्ये अधिक आकर्षक भर घालते. मागील बाजूस ड्युअल ब्रेक लाईट्स, रियर बंपर, स्पॉयलर, तसेच इंटरकनेक्टेड LED टेल लॅम्प्स यामुळे गाडी अधिक स्टायलिश दिसते.

सेफ्टीमध्ये मोठी सुधारणा
BYD ने या फेसलिफ्टेड मॉडेलमध्ये “God’s Eye ADAS System” सादर केली आहे, जी SUV साठी 360-डिग्री सुरक्षा कव्हरेज देते. या प्रणालीमध्ये तीन कॅमेरे (विंडशील्डच्या खाली), चार सराउंड-व्ह्यू कॅमेरे, पाच लांब पल्ल्याचे कॅमेरे, पाच मिमी-वेव्ह रडार, आणि 12 अल्ट्रासोनिक रडार समाविष्ट आहेत. एकूण 29 प्रगत सेन्सर्स या SUV ला अधिक सुरक्षित बनवतात, ज्यामुळे चालकाला उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
शक्तिशाली बॅटरी
BYD Atto 3 फेसलिफ्टमध्ये पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतात उपलब्ध असलेल्या Atto 3 मध्ये 60.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे, जी 420 किमी पर्यंत रेंज देते. यामुळे ही कार लांबच्या प्रवासासाठी उत्कृष्ट पर्याय मानली जात आहे.
भारतामध्ये लॉन्च कधी होईल?
BYD ने Atto 3 फेसलिफ्ट ची अधिकृत लॉन्च तारीख जाहीर केलेली नाही, मात्र भारतीय बाजारात ही SUV लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. ग्राहकांचा EV सेगमेंट मध्ये वाढता कल पाहता, या नवीन मॉडेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो. जर BYD ने योग्य किंमतीत ही गाडी सादर केली, तर भारतीय बाजारपेठेत त्याचा प्रभाव वाढू शकतो.