आताची नवीन पिढी असो की जुनी पिढी यांच्यामध्ये सगळ्यात मोठी क्रेझ दिसून येते ती बुलेट या बाईकची होय. रॉयल एनफिल्डची बुलेट म्हणजे आजच्या तरुणाईची खास अशी पसंती असून मोठ्या प्रमाणावर तरुणाई बुलेट खरेदीला प्राधान्य देतात. परंतु 80 ते 90 चे दशक बघितले तर यामध्ये राजदूत 350 बाईकचे खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ होती.
सगळ्यात जास्त रस्त्यांवर धावताना तेव्हा राजदूत दिसून यायची. नंतर कालांतराने मात्र कंपनीच्या माध्यमातून या बाईकचे उत्पादन बंद करण्यात आले होते व आता राजदूत जवळपास नाहीशी झाल्यात जमा आहे.
परंतु आता कंपनी पुन्हा एकदा नवीन अवतारामध्ये राजदूत लॉन्च करण्याच्या तयारीत असून बुलेटचे मार्केट जाम करायला ही राजदूत येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
याबाबत कंपनीने जाहीर केले आहे की, राजदूतच नवीन रूपात आता पुन्हा बाजारात लॉन्च करण्यात येणार असून यावेळी ही बाईक पावरफुलच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशी असणार आहे. त्यामुळे आता तरुणाईला बुलेटला एक उत्तम असा पर्याय मिळणार आहे.
काय असतील राजदूत 350 ची वैशिष्ट्ये?
राजदूत 350 मध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली वैशिष्ट्ये जोडली जात असून त्यामुळे ही बाईक आता आधुनिक आणि प्रगत होण्यास मदत होईल. त्यासोबतच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल स्पीडोमीटर, ट्रीप मीटर तसेच समोर डीस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक अशी वैशिष्ट्ये असणार आहे.
इतकेच नाही तर हेडलाईट, टेल लाईट आणि स्टॅन्ड अलार्म आणि घड्याळ यांचा देखील समावेश असणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील आवश्यक वैशिष्ट्ये या बाईकमध्ये असणार असून या बाईकची लांब आणि आरामदायी सीट म्हणजेच आसनव्यवस्था व उत्तम असे सस्पेन्शन सिस्टम लांब अंतराच्या प्रवासासाठी एक आरामदायक पर्याय ठरणार आहे.
या बाईकमध्ये 350cc इंजिन देण्यात आले असून जे 12.04 बीएचपी पावर आणि नऊ एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असणार आहे. विशेष म्हणजे मायलेज देखील 62 किलोमीटर पर लिटरपर्यंत असणार आहे. त्यामुळे ही बाईक पावरफुलच नाही तर परवडणारी देखील असणार आहे.
किती राहील किंमत?
जर तुम्हाला राजदूत 350 खरेदी करायची असेल तर त्याची एक्स शोरूम किंमत सुमारे 2 लाख 21 हजार रुपये पर्यंत असणार आहे. काही वेगवेगळ्या शहर आणि शोरूममध्ये किमतीत थोडाफार बदल होऊ शकतो.