Citroen C3 Aircross SUV:- सध्या अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वेगवेगळे वैशिष्ट्य असलेली अनेक कार सादर केल्या जात असून यामध्ये इलेक्ट्रिक कार देखील मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांकडून सादर केला जात आहेत. यामध्ये अनेक ईएसयुव्ही कारचा देखील समावेश आहे. जर आपण एसयूव्हीचा सेगमेंट पाहिला तर यामध्ये अनेक कार आले असून त्या देखील परवडणाऱ्या किमतींमध्ये सादर करण्यात आलेले आहे.
या सगळ्या कार मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये असून यांच्या किमती देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. यामध्ये Citroen India ने Citroen C3 Aircross SUV ही ऑटोमॅटिक गिअर बॉक्स असलेली कार लॉन्च केलेली आहे. विशेष म्हणजे ही कार C3 एअर क्रॉस ऑटोमॅटिकला प्लस,Max आणि Maxx(5+2 आसन ) सह तीन व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. त्यामुळे जर तुम्ही चालवायला सोपी असलेल्या ऑटोमॅटिक कार विकत घ्यायचा प्लॅनिंग करत असाल तर ही कार तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.
काय आहे या कारमध्ये वैशिष्ट्ये?
Citroen C3 एअर क्रॉस ऑटोमॅटिक व्हेरिएंट देखील त्याच 1.2L, इन सिलेंडर टर्बोचार्जेड पेट्रोल इंजिनसह येते. जो मॅन्युअल प्रकारांमध्ये देखील उपलब्ध आहे. तसेच सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले इंजिन 109 बी एच पी पावर आणि 205 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच या ऑटोमॅटिक c3 एअर क्रॉस ला वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सह 10.2 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार स्पीकर तसेच स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल, कनेक्टेड कार टेक, फ्रंट आणि रियर यूएसबी चार्जर, ऍडजेस्टेबल हेडरेस्ट आणि एलईडी डीआरएलएस आहेत. तसेच यामध्ये ड्रायव्हिंग विषयी आवश्यक माहिती देणार सात इंचाचा टीएफटी क्लस्टर देखील देण्यात आला आहे.
तसेच फ्रंट फॉग लॅम्प, शार्क फिन अँटेना, रियल व्हिव कॅमेरा, वॉशरसह मागील वायपर, लेदर रॅपड स्टेरिंग व्हील, 17 इंच डायमंड कट आलोय व्हील आणि दोन ट्विटर्स चार स्पीकर देण्यात आलेले आहे. यूएसबी चार्जिंग सॉकेट तसेच डायनॅमिक गाईडलाईन्स, रियर वायपर आणि बरेच महत्त्वाचे एडवांस वैशिष्ट्ये देखील यामध्ये आहेत.
किती आहे किंमत?
ही कार तीन व्हेरिएंटमध्ये असून त्यातील प्लस एटी व्हेरियंटची किंमत बारा लाख 45 हजार रुपये तर मॅक्स 5 सीटर एटी व्हेरियंटची किंमत 13 लाख 50 हजार रुपये आणि मॅक्स 7 सीटर एटी व्हेरीएंटची किंमत 13 लाख 85 हजार रुपये इतकी आहे. त्यामध्ये लक्षात घ्यावे की या किमती एक्स शोरूम आहेत. तुम्हाला जर या कारची बुकिंग करायची असेल तर ती सुरू झाली असून तुम्ही 25 हजारामध्ये बुकिंग करू शकता.