नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बजाज 3 मे ला लॉन्च करणार ‘ही’ नवीन टू व्हीलर

Bajaj New Two Wheeler

Bajaj New Two Wheeler : तुम्हीही नजीकच्या भविष्यात टू व्हीलर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. विशेषता ज्यांना बजाजची बाईक खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाज कंपनी येत्या दोन दिवसात अर्थातच तीन मे ला आपली एक नवीन बाईक लॉन्च करणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बजाज ऑटो कंपनीने नुकताच अपकमिंग Pulsar NS400 या बाईकचा नवीन टीझर जारी केला आहे. यात या नवीन मोटरसायकलची झलक पाहायला मिळाली आहे. तेव्हापासून हा टीझर बाहेर आला आहे तेव्हापासून या बाईकच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत.

ही मोटरसायकल केव्हा लॉन्च होणार आणि या बाईकचे फीचर्स कसे आहेत याबाबत लोकांना जाणून घ्यायचे आहे. ही बाईक 3 मे रोजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. बजाजच्या पोर्टफोलिओ मध्ये येणारे आणि पल्सरच्या लाइनअपमध्ये सामील होणारे ही अपकमिंग बाईक कंपनीचे एक फ्लॅगशिप मॉडेल राहणार आहे.

यामुळे या बाईकची सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण या बाईकचे डिझाईन कसं आहे, इंजिन कस आहे, फीचर्स कसे आहेत ? हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डिझाईन कशी आहे

कंपनीने जारी केलेल्या नवीन टीझर सूचित करतो की, या नवीन पल्सरमध्ये अलॉय व्हील्स दिले जाणार आहेत. ही मोटारसायकल पांढऱ्या आणि काळ्या रंगात दिसू शकते.  इंधन टाकीवर ‘NS’ लिहिलेले राहणार आहे, तर मागील बाजूस ‘400’ अशी बॅजिंग पाहायला मिळतं आहे. मागील टीझर्समध्ये हे देखील दिसून आले आहे की मोटारसायकल USD फोर्क्स, ड्युअल-चॅनेल ABS आणि नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह बाजारात येणार आहे.

फिचर्स कसे राहणार 

नव्याने लॉन्च होणारे या बाईक मध्ये अनेक भन्नाट फीचर्स अपलोडेड राहणार आहेत. USD फोर्क्स या नवीन मोटारसायकलला अधिक परिष्कृत आणि कंपोज्ड राइड गुणवत्ता प्रदान करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ऑफरवर ड्युअल-चॅनल ABS आहे, परंतु ऑफरवर ऑन/ऑफ, रेन आणि रोड सारखे ABS मोड देखील असतील. या गाडीत एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील राहणार आहे. हे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. Pulsar NS400 ट्रॅक्शन कंट्रोलसह येणार आहे. 

कसं राहणार इंजिन

बजाज ऑटो कंपनी पल्सर NS400 मध्ये डोमिनार 400 प्रमाणेच इंजिन वापरले जाणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे 373cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे KTM ने मागील 390 Duke साठी वापरले होते. पण, बजाजने त्यात आमूलाग्र बदल केले आहेत. Dominar 400 मधील इंजिन सुमारे 40 bhp कमाल पॉवर आणि 35 Nm टॉर्क निर्माण करत असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe