मोठी बातमी ! महिंद्रा एक्सयुवी 300 चं नवीन वर्जन ‘या’ तारखेला लॉन्च होणार, वाचा सविस्तर

Mahindra XUV 300 : महिंद्रा अँड महिंद्रा ही देशातील एक प्रमुख कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. या कंपनीचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा एक्सयुव्ही 300 गाडीच्या चाहत्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे या गाडीचे अपडेटेड व्हर्जन लवकरच बाजारात लाँच होणार आहे. या गाडीचे अपडेटेड व्हर्जन महिंद्रा एक्सयुव्ही 300 फेसलिफ्ट लवकरच बाजारात लाँच होणार असल्याने गाडीच्या चाहत्यांसाठी ही निश्चितच एक आनंदाची पर्वणी राहणार आहे. खरे तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि अलीकडेच महिंद्रा एक्स यु व्ही 400 या गाडीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँचं केले होते. यामध्ये कंपनीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

गाडीचे इंटेरियर मध्ये आणि फीचर्स मध्ये मूलभूत बदल झाले आहेत. हे फेसलिफ्ट मॉडेल दोन व्हेरिएंट मध्ये बाजारात लॉन्च झालेले आहे. दरम्यान यापासूनच इन्स्पायर होऊन कंपनीने आता महिंद्रा एक्सयुवी 300 चं नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी दाखवली आहे. या गाडीमध्ये देखील अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे XUV 300 फेसलिफ्ट मॉडेल लवकरच ग्राहकांसाठी लॉन्च केले जाणार आहे. मात्र ही गाडी केव्हा लॉन्च होणार याबाबत कंपनीकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे ही गाडी केव्हा लॉन्च होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. आता आपण या गाडीचे फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मीडिया रिपोर्टनुसार, या नवीन गाडीत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. आधीच्या मॉडेल पेक्षा अनेक नवीन फिचर्स यामध्ये पाहायला मिळू शकतात अशी आशा आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या फेसलिफ्ट मॉडेल मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, कंपनीचा नवीनतम AdrenoX वापरकर्ता इंटरफेसं, Android Auto आणि Apple CarPlay साठी वायरलेस कनेक्टिव्हिटी असे भन्नाट फीचर्स या गाडीत राहणार आहेत.

या नवीन XUV300 मध्ये कलर MID आणि मध्यभागी ड्युअल पॉड्ससह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळणार आहे. ग्राहकांना AdrenoX-कनेक्टेड कार सिस्टीम देखील अनुभवता येईल, जी स्थळ-आधारित सेवा, रिमोट व्हेईकल ऑपरेशन्स, मल्टिपल अॅलर्ट्स आणि वाहन स्टेटस अपडेट्स यांसारख्या 60 हून अधिक फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ही गाडी लवकरच ग्राहकांच्या पसंतीस खरी उतरणार अशी कंपनी.

मागील सीटच्या प्रवाशांच्या आरामात वाढ करण्यासाठी, महिंद्रा XUV300 फेसलिफ्टला रियर एसी व्हेंट्स आणि खाली स्टोरेज स्पेस, मागील सीटला एअरबॅग्ज आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट असे फीचर्सही या गाडीत राहणार आहेत. या गाडीला 6 एअरबॅग्ज दिल्या जातील असे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या फेसलिफ्ट मॉडेल चे इंजिन मात्र जुन्या गाडी प्रमाणेच राहणार आहे. यात कोणताच बदल होणार नाही असे बोलले जात आहे. त्यामुळे आता ही गाडी बाजारात केव्हा लॉन्च होणार त्याकडे ग्राहकांचे विशेष लक्ष राहणार आहे.