मोठी बातमी ! ‘ही’ नामांकित दुचाकी निर्माती कंपनी सीएनजीवर चालणारी बाईक लॉन्च करणार ?

CNG Scooter : भारतात गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडलेले पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत.

यामुळे नागरिकांच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशातच मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात आता लवकरच सीएनजी मोटरसायकल लॉन्च होणार आहे. खरे तर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे वैतागलेले अनेक जण सीएनजी कार वापरत असल्याचे पाहिले असेल. तुम्ही स्वतः देखील पेट्रोल डिझेलमुळे सीएनजी कार वापरणे पसंत करत असाल.

मात्र बाजारात अद्याप सीएनजी मोटरसायकल आलेली नाही. पण आता लवकरच बाजारात सीएनजी वर चालणारे मोटरसायकल देखील लॉन्च होणार असे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये झळकू लागले आहे. देशातील एक नामांकित मोटरसायकल निर्माती कंपनी सीएनजी वर चालणारी मोटर बाईक तयार करणार असल्याचा दावा केला जात आहे.

कोणती कंपनी लॉन्च करणार सीएनजीवर चालणारी मोटरसायकल

हाती आलेल्या माहितीनुसार बजाज कंपनी सीएनजीवर चालणारी पहिली मोटरसायकल लाँच करणार आहे. मात्र ही गाडी कशी राहणार, या गाडीची लॉन्चिंग केव्हा होणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

परंतु सीएनजीवर चालणारी मोटरसायकल 100 ते 125cc सेगमेंट मध्ये बाजारात लॉन्च होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यामुळे आता सीएनजी वर चालणारी मोटरसायकल भारतीय बाजारात केव्हा उतरणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

बजाज चेतक लाँच होणार नव्या रूपात

खरे तर बजाज आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेहमीच सुधारणा करत असते. याच पार्श्वभूमीवर आता कंपनीच्या माध्यमातून चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च केले जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चेतक चे नवीन मॉडेल बाजारात लॉन्च होणार असा दावा होत आहे.

विशेष म्हणजे नवीन चेतक मॉडेल हे स्वस्त राहील अशी आशा आहे. या स्कूटरची एथर, ओला आणि टीव्हीएस या कंपन्यांसोबत स्पर्धा राहणार आहे. तथापि ही नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात केव्हा लॉन्च होणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe