Bike News:- भारतामध्ये गेल्या 40 ते 50 वर्षाअगोदरचा विचार केला तर काही बाईक या खूप प्रसिद्ध होत्या. त्या कालावधीमध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये बीएसए, रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या दुचाकी काही श्रीमंत लोकांकडे दिसून यायच्या. परंतु या बाईक वजनाने जड व त्यांचे मायलेज कमी असल्यामुळे ते बहुसंख्य लोकांऐवजी काही मोजक्या लोकांकडे होत्या.
यानंतरच्या कालावधीमध्ये मात्र सगळ्यांना वापरता येईल अशी एक बाईक बाजारपेठेमध्ये आली होती. बुलेट आणि बीएसए या दुचाकी ऐवजी या बाईकचे वजन देखील कमी होते व या बाईकचे कार्बोरेटर हे नवीन पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले होते. त्यामुळे ही बाईक लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाली होती.
साधारणपणे ही तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी भारतीय रस्त्यांवर अस्तित्वात होती. तेव्हा या बाईकमध्ये 173 सीसी इंजिनचा वापर केला गेला होता व ते खूप हलक व आकर्षक होतं. विशेष म्हणजे ही बाईक खडबडीत रस्त्यांवरून किंवा कशाही रस्त्यांवरून चालवण्यासाठी खूप योग्य ठरली होती. तीच बाईक आता नवीन अवतारामध्ये बाजारपेठेत येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे.
राजदूत येणार नवीन अवतारात
राजदूत ही बाईक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही बाईक प्रामुख्याने ॲम्बेसेडर या नावाने प्रामुख्याने ओळखले जात होती व या गाडीचे पूर्ण नाव ॲम्बेसिडर एक्सेल टी होते. राजदूत ही बाईक प्रामुख्याने एक्सकोर्ट आणि यामाहा यांच्या भागीदारीतून तयार करण्यात आलेली होती.यानंतर यामाहाने देखील काही बाईक्स बाजारपेठेमध्ये आल्या.
महत्वाची बातमी म्हणजे आता राजदूत ही बाईक पुन्हा एकदा जोमात कमबॅक करण्याच्या तयारीत असून लवकरच रस्त्यांवर धावेल अशी अपेक्षा आहे. एक्सकोर्ट या कंपनीचा विचार केला तर ही ट्रॅक्टर आणि इतर कमर्शियल व्हेईकल चे उत्पादन करते. परंतु आता ही बाईक एक नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञानासह हे बाईक तयार केली जात आहे.
महत्वाचे म्हणजे यामध्ये आता 250cc चे चार स्ट्रोक इंजन वापरण्यात येणार आहे. हे इंजन लिक्विड कुल्ड असेल व याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ती खूप महत्त्वपूर्ण असेल. तसेच मायलेज देखील चांगले राहिल अशी शक्यता आहे. बदलत्या काळानुसार यामध्ये आता अनेक आधुनिक वैशिष्ट्ये म्हणजेच फीचर्स वापरण्यात येतील.
यामध्ये डिजिटल डिस्प्ले, नेविगेशन, ड्राईव्ह ऍनालिटिक्स, मोबाईल चार्जिंग, स्लीपर क्लच यासारखे अनेक वैशिष्ट्ये दिसून येतील. तसे पाहायला गेले तर कंपनीच्या माध्यमातून ही ॲम्बेसिडर लॉन्च करण्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा किंवा वक्तव्य आले नसले तरी मीडिया रिपोर्टचा हवाला घेतला तर ही मोटरसायकल येत्या एक वर्षांमध्ये शोकेश केली जाण्याची शक्यता आहे व त्यानंतर काही वेळामध्ये ती लॉन्च केली जाईल व तिची डिलिव्हरी देखील सुरू होईल अशी अपेक्षा आहे.