दूरसंचार कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये जीओ, एअरटेल तसेच व्हीआय यासारख्या खाजगी कंपन्यांचा विचार करता येईल. या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल देखील एक महत्त्वाची भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कंपनी असून जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांना सध्या तगडी टक्कर देताना दिसून येत आहे.
बीएसएनएलकडे इतर कंपन्यांच्या तुलनेने ग्राहकांची संख्या कमी आहे. परंतु भारतामध्ये असलेल्या आठ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांसाठी बीएसएनएल कायम अनेक उत्तम असे प्लान्स आणताना आपल्याला दिसून येत आहे.
बीएसएनएलची जर आपण सेवा बघितली तर ग्राहकांना बीएसएनएलच्या माध्यमातून पोस्टपेड आणि प्रीपेड तसेच ब्रॉडबँड सेवा देण्यात येते. बीएसएनएलच्या माध्यमातून पोस्टपेड व प्रीपेड मध्ये देखील अनेक धमाकेदार ऑफर आणले गेले आहेत व त्यासोबत आता ब्रॉड बँडमध्ये देखील कंपनीच्या माध्यमातून एक चांगली ऑफर आणण्यात आली आहे.
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक स्वस्त प्लान अपग्रेड केला असून या प्लानच्या माध्यमातून आता कमी किमतीत हायस्पीड इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार पूर्वीपेक्षा अनेक सुविधा
तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल व तुमच्याकडे जर बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन असेल तर तुम्हाला आता जास्त पैसे खर्च न करता हायस्पीड डेटा आणि जास्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे. कारण बीएसएनएल ने त्यांच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये पूर्वीपेक्षा जास्त डेटा आणि जास्त इंटरनेट स्पीड देऊ केला आहे.
बीएसएनएलच्या माध्यमातून जे ब्रॉड बँड कनेक्शन असलेले ग्राहक आहेत त्यांच्याकरिता 2020 मध्ये 599 रुपयांचा फायबर बेसिक प्लस योजना लॉन्च करण्यात आली होती व आता या प्लॅनमध्ये कंपनीच्या माध्यमातून 60 mbps स्पीडने डेटा देत होती.
परंतु आता ग्राहक एका महिन्यात 3.3 टीबी डेटा वापरू शकतात.डेटा चा लिमिट संपला तरी देखील ग्राहक दोन एमबीबीएसच्या स्पीडने डेटाचा वापर करू शकणार आहेत.
कंपनीच्या माध्यमातून 599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लान मधील सुविधा पूर्णपणे अपडेट करण्यात आल्या असून जर तुम्ही हा प्लान घेतला असेल तर तुम्हाला आता 75 एमबीपीएसचा स्पीड मिळणार असून संपूर्ण महिन्यात 3.3 टीबी ऐवजी चार हजार जीबी डेटा वापरू शकणार आहेत. एवढेच नाही तर या प्लानमध्ये ग्राहकांना कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
599 रुपयाच्या प्लानमध्ये आता कोणत्या मिळणार सुविधा?
बीएसएनएलच्या माध्यमातून माध्यमातून 599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लानच्या सुविधा अपग्रेड करण्यात आले असून आता ग्राहकांना चार हजार जीबी डेटा मिळणार आहे.तसेच कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
मनोरंजनाकरिता Disney+Hotstar Super चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात असून यामध्ये तुम्हाला हायस्पीड डेटा, कॉलिंगची सुविधा तसेच ओटीटी ॲप्सचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी 599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लान फायद्याचा ठरणार आहे.