7 Seater Car:- कार खरेदी करताना ज्याप्रमाणे आपला बजेट आवश्यक असतो त्याप्रमाणे आपण जी काही कार घेत आहोत ती आपल्या कुटुंबासाठी पुरेशी ठरेल का? तसेच त्या कारचे मायलेज आणि इतर महत्त्वाचे फीचर्स ह्या गोष्टींचा विचार प्रामुख्याने केला जातो. या सगळ्या गोष्टी आणि बजेट जुळला तर आपण कार घ्यायचे निश्चित करतो.
यामध्ये जर कुटुंबाकरिता कार घ्यायचे असेल तर प्रामुख्याने भारतात सात सीटर कारला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते व त्यामुळेच भारतात स्वस्त अशा सात सीटर कारला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
भारतीय कार बाजारपेठेमध्ये सात सीटर कारचे अनेक नवीन मॉडेल उपलब्ध असून त्यातील बरेच मॉडेल्स हे जवळपास बजेटमध्ये मिळतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा एका सात सीटर कारची माहिती घेणार आहोत जी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळते आणि कुटुंबाकरिता व रोजच्या वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे.
रेनॉल्ट ट्रायबर ठरेल उत्तम सात सीटर कार
तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबाकरिता बजेट मध्ये सात सीटर कार घ्यायची असेल तर रेनॉल्ट ट्रायबर ही कार एक उत्तम पर्याय ठरेल. या कारमध्ये पाच अधिक दोन असा सिटिंगचा पर्याय देण्यात आला असून यामध्ये सात लोक आरामात बसू शकतात.
परंतु या कारमध्ये जास्त बूट स्पेस देण्यात आलेला नाही. तुम्ही जर या कारचे फीचर्स बघितले तर या कारमध्ये आठ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली असून जी एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होऊ शकते.
कसे आहे या कारचे इंजिन?
दमदार परफॉर्मन्ससाठी या कारमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे ७२ पीएस पावर आणि 96 एनएमचा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. मायलेज बघितले तर वीस किलोमीटर पर लिटरचे मायलेज असून या कारमध्ये सेफ्टी करिता एअरबॅग्स आणि ईबीडी सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमचे सुविधा दिली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आहे महत्त्वाची
या कारमध्ये चार एअरबॅग्स, इबीडी सह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम तसेच हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर, रियर व्ह्यू कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेली असून या वैशिष्ट्यांमुळे ही कार अधिक खास बनते.
किती आहे या कारची किंमत?
रेनॉल्ट ट्रायबर या सात सीटर कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.