Best Mileage Car : जर तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष हाच राहणार आहे. खरे तर अलीकडे लोकांमध्ये एसयूव्ही गाड्यांची क्रेझ वाढली आहे.
आता लोक SUV कार खरेदीला अधिक पसंती दाखवत आहेत. विशेषता नवयुवक तरुण SUV कार खरेदीला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. मात्र असे असले तरी आजही भारतीय बाजारांमध्ये सेडान सेगमेंटच्या कार मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. सेडान कार देखील अनेकांच्या आवडत्या आहेत.
मध्यमवर्गीय लोकांना या गाड्या विशेष आवडतात. दमदार मायलेज आणि गजब फीचर्स यामुळे या गाड्या मध्यमवर्गीयांच्या पहिली पसंत आहेत. या सेगमेंटमध्ये कार खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. जर तुम्हीही नवीन सेडान कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशा दोन सेडान कारची माहिती घेऊन आलो आहोत ज्या जबरदस्त मायलेज आणि गजबच्या फीचर्स मुळे ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
Tata Tigor CNG :
जर तुम्हाला ही नवीन वर्षात कार खरेदी करायची असेल तर ही कार तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. ही सेडान कार मध्यमवर्गीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. जर तुम्हालाही या सेगमेंट मधील कार खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची ही सीएनजी कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या कार मध्ये 1199cc 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार 26.4 किमी/पीएल मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे.
या गाडीची एक्स-शोरूम किंमत 7.80 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. यामुळे जर तुम्हाला ही दमदार मायलेजवाले सीएनजी कार हवी असेल तर या गाडीचा ऑप्शन तुमच्यासाठी फायदेमंद ठरू शकतो.
Hyundai Aura CNG :
ह्युंदाई ही देशातील एक लोकप्रिय कारनिर्माता कंपनी आहे. या कंपनीची Aura ही सीएनजी गाडी कार घेणाऱ्यांची पहिली पसंत ठरते. या गाडीची किंमत आणि दमदार मायलेज मध्यमवर्गीयांना विशेष आकर्षित करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीची एक्स-शोरूम किंमत 8.23 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
या गाडीत कंपनीने अनेक भन्नाट फीचर्स दिले आहेत. या गाडीचे इंजिन देखील खूपच दमदार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये 1197 cc क्षमतेचे इंजिन आहे, हे इंजिन 67.72 BHP ची कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे.
ही सीएनजी गाडी 22 किमी/किलो पर्यंतचे दमदार मायलेज देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे जर तुम्हीही दमदार मायलेजची सीएनजी गाडी घेऊ इच्छित असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी निश्चितच एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.