इलेक्ट्रिक कार घेताय, पैसे तयार ठेवा; टाटा लवकरच लॉन्च करणार ‘या’ दोन इलेक्ट्रिक कार, वाचा डिटेल्स

Tata New Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार मोठा वाढला आहे. मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आता मोठी मागणी आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक वाहनांना विशेष पसंती दाखवली जात आहे. विशेष बाब अशी की, केंद्र शासनाने देखील आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता ग्राहकांना देखील इलेक्ट्रिक वाहने आवडू लागली आहेत.

अलीकडेच अनेकांनी इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या आहेत. दरम्यान जर तुम्हीही या नवीन वर्षात इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी टाटा एक गुड न्यूज घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा ही देशातील एक अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी लवकरच दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर पैसे तयार ठेवा कारण की टाटा लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणखी मोठा धमाका करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा कंपनी टाटा कर्व इलेक्ट्रिक आणि टाटा हॅरियर इलेक्ट्रिक कार यावर्षअखेरपर्यंत लॉन्च करण्याची शक्यता आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी डिटेल माहिती.

बाजारात केव्हा लॉन्च होणार टाटा कर्व आणि टाटा हॅरियर इलेक्ट्रिक

Tata कर्व EV ही कंपनीची Punch Ev नंतर या वर्षात लाँच होणारी दुसरी इलेक्ट्रिक कार राहणार आहे. या लाइनअपमध्ये ही गाडी Nexon EV च्या वर राहील. असे बोलले जात आहे की, टाटा कंपनीची ही नव्याने बाजारात दाखल होणारी गाडी आगामी Hyundai Creta EV शी स्पर्धा करणार आहे.

Curve EV चार-दरवाजा असलेल्या SUV-कूप बॉडीने सुसज्ज राहणार आहे. Tata Motors ने प्रथम Curve EV लाँच करण्याची योजना आखली आहे ज्यामुळे ब्रँडला Creta EV च्या आगमनापूर्वी मध्यम आकाराच्या EV SUV सेगमेंटमध्ये आघाडी मिळवण्यात मदत होणार असा विश्वास आहे.

दुसरीकडे टाटा हॅरियर इलेक्ट्रिक बाबत बोलायचं झालं तर ही गाडी देखील लवकरच बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कर्व इलेक्ट्रिक लॉन्च झाल्यानंतर लगेचच हॅरियर इलेक्ट्रिक लॉन्च होईल अशी माहिती समोर येत आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत हॅरियर इलेक्ट्रिक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे. यामुळे आता कंपनीच्या या दोन्ही गाड्या केव्हा लाँच होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe