New Car Launching : या चालू नवीन वर्षात कार घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेक जण नवीन कार खरेदी करणार आहेत.
जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे जानेवारी 2024 अखेरपर्यंत भारतातील ऑटो सेक्टर मधील अनेक नामांकित कंपन्या आपल्या लोकप्रिय गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या चालू महिन्यात नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी अनेक नवीन ऑप्शन्स लवकरच अवेलेबल होणार आहेत. दरम्यान आता आपण या चालू महिन्यात कोणकोणत्या कंपन्या नवीन कार लॉन्च करणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या गाडीचा देखील समावेश होतो. मध्यमवर्गीयांची ही आवडती कार गेल्या काही वर्षांपासून मार्केटमध्ये आपला धबधबा कायम ठेवून आहे.
दरम्यान कंपनीच्या माध्यमातून या गाडीचे फेसलिफ्ट व्हर्जन जानेवारी 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. खरे तर हे फेसलिफ्ट वर्जन जागतिक बाजारात लॉन्च झाले आहे. ग्लोबली ही कार लॉन्च झाली असल्याने जानेवारी 2024 मध्ये ही कार भारतीय बाजारात देखील लॉन्च होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यामुळे जर तुम्हालाही नवीन वर्षात नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा देखील एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट : भारतात ह्युंदाई ही कार कंपनी मोठी लोकप्रिय आहे. या कंपनीचे लाखो संतुष्टक ग्राहक आहेत. दरम्यान ही कंपनी या चालू वर्षात आपल्या लोकप्रिय गाडीचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार आहे. ही कंपनी 16 जानेवारी 2024 रोजी ह्युंदाई क्रेटा या गाडीचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारमध्ये, ग्राहकांना नवीन डिझाइन केलेले ग्रिल, स्प्लिट प्रोजेक्टर हँडल मिळणार आहे. तसेच या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारच्या आतील भागात ADAS तंत्रज्ञान, 360 डिग्री कॅमेरा आणि अपडेटेड 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार अशी माहिती समोर आली आहे.
महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट : महिंद्रा हे देखील भारतातील एक प्रमुख कार मेकर कंपनी आहे. या कंपनीची लोकप्रियता भारतात खूपच अधिक आहे. दरम्यान भारतातील आघाडीच्या कार निर्माता कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून या चालू वर्षात एक मोठा धमाका केला जाणार आहे.
कंपनी आपली लोकप्रिय XUV300 चे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार आहे. जानेवारी महिन्यात ही गाडी लॉन्च होणार आहे. यात मोठ्या प्रमाणात नवीन बदल केले जाणार आहेत. या कारला नवीन ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग दिवे आणि कनेक्ट केलेल्या एलईडी लाइट बारसह पूर्णपणे नवीन फ्रंट आणि रियर-एंड मिळणार आहे.
कंपनी गाडीच्या आतील भागात 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन जोडणार अशी माहिती देखील समोर आली आहे. यामुळे ही गाडी केव्हा लॉन्च होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.