Car Care Tips:- जेव्हा आपण नवीन कोणत्याही प्रकारचे वाहन खरेदी करतो व नंतर मात्र आपण वाहनाची खूप जीवापाड अशी काळजी घेत असतो. कारण नव्या वाहनावर जर काही स्क्रॅचेस म्हणजेच ओरखडे वगैरे पडले तर ते दिसायला तेवढा भाग हा चांगला दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या वाहनाला स्क्रॅचेस पडू नये या दृष्टिकोनातून काळजी घेत असतो.
कारच्या बाबतीत पाहिले तर बऱ्याचदा पार्किंगमध्ये रिव्हर्स घेताना किंवा एखाद्या अडचणीच्या जागेत कार लावत असताना चुकून कुठेतरी धक्का लागतो आणि कारवर स्क्रेचेस होतात. त्यामुळे प्रत्येक जण कारला किंवा इतर वाहनाला स्क्रॅचेस होऊ नये त्या दृष्टिकोनातून काळजी घेत असतात.
परंतु बऱ्याचदा काळजी घेऊन देखील एक छोटीशी चूक देखील स्क्रेचेस पडायला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या कारला स्क्रॅचेस पडू नये व कायम ती नवीकोरी दिसावी असे वाटत असेल तर फक्त 298 रुपयांची एक वस्तू जर तुम्ही आणली तरी तुम्हीच स्क्रेचेस पासून तुमच्या कारचं रक्षण करू शकता.
स्वस्तातली ही वस्तू आणा आणि स्क्रॅचेस पासून कारचा बचाव करा
1- फॅबटेक कार बंपर स्क्रॅच गार्ड– फॅबटेक कार बंपर स्क्रॅच गार्ड हे एक मजबूत असते व ते जर तुम्ही कारला लावले तर छोट्या मोठ्या स्क्रॅच पासून कारचा बचाव करू शकते. जवळपास सर्वच कारमध्ये हा गार्ड फिट असतो.
परंतु तुम्हाला जर हा गार्ड घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा मेकॅनिकच्या दुकानातून देखील खरेदी करू शकतात. तुम्हाला जर कार खरेदी करायचा असेल तर ॲमेझॉनवर यावर 65 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत असून तुम्ही त्याला 248 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
2- व्हीआरटी कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर– हे सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर देखील कारचे स्क्रॅचेस पासून सुरक्षा करते. कारची पुढची आणि मागची बाजूचे स्क्रॅचेस पासून संरक्षण करण्यासाठी हे सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर फायद्याचे ठरते.
ॲमेझॉन वर 70 टक्के डिस्काउंटमध्ये हे गार्ड तुम्ही घेऊ शकतात व त्याची किंमत तुम्हाला 299 रुपये इतकी पडेल. पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हे सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर फायद्याचे आहे.
3- सल्फर कार बंपर स्क्रॅच गार्ड– सल्फर कार बंपर प्रोटेक्टर स्क्रॅच गार्ड देखील खूप फायद्याचे असून कारला स्क्रॅचपासून वाचवण्याची क्षमता यामध्ये आहे. बाजारात जर तुम्ही याला घ्यायला गेलात तर त्याची बाजारामध्ये किंमत 999 रुपये इतकी आहे.
परंतु तुम्ही जर ॲमेझॉन वर घेतले तर त्यावर 70 टक्के डिस्काउंट मिळत असल्याने ते 299 मध्ये तुम्ही खरेदी करू शकतात.
कारचा पेंट देखील राहतो सुरक्षित
बंपर गार्ड हे कारचे स्क्रॅच पासूनच नाहीतर कारचा जो काही रंग म्हणजेच पेंट असतो त्याचे देखील संरक्षण करते. बंपरला जर एखादी वस्तू धडकली किंवा आदळली तर ती गार्डला लागते व अशा वस्तूचा आदळण्याचा प्रत्यक्ष संपर्क कारच्या पेंटशी येत नसल्यामुळे पेंटचे नुकसान होत नाही किंवा त्याची शक्यता कमी होते.
याशिवाय तुम्ही कमी जागा असेल त्या ठिकाणी देखील पार्किंग करताना तुम्हाला या गार्डची मदत होऊ शकते. हे बंपर गार्ड कारला भिंती किंवा इतर कारला धडकण्यापासून वाचवू शकते.