Car Discount Offer:- सध्या कार बाजारपेठेमध्ये अनेक कार निर्माता कंपन्यांनी विविध प्रकारच्या मॉडेल्सवर शानदार डिस्काउंट ऑफर सुरू केलेले आहेत व याचा फायदा देखील ग्राहकांच्या माध्यमातून घेतला जात आहे. कंपन्यांमध्ये जर आपण मारुती सुझुकी हे नाव पाहिले तर हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून ग्राहकांमध्ये खास लोकप्रिय असे नाव असून आजपर्यंत या कंपनीच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि परवडतील अशा किमतींमध्ये कार लॉन्च करण्यात आलेले आहेत.
सध्या ऑटो मार्केटमध्ये ज्या काही शानदार डिस्काउंट ऑफर सुरू आहेत त्यामध्ये मारुती सुझुकी या कंपनीच्या लोकप्रिय एसयुव्हीवर येणाऱ्या डिस्काउंटचा समावेश करावा लागेल. कंपनीच्या माध्यमातून या लोकप्रिय असलेल्या एसयूव्हीवर बंपर सूट देण्यात येत आहे.
मारुती सुझुकी जिमनीवर देत आहे अडीच लाखापर्यंत सवलत
मारुती सुझुकी ने जून 2023 मध्ये पाच डोर जिमनी लॉंच केली होती. परंतु लॉन्च झाल्यापासून मार्केट काबीज करण्यामध्ये या कारला खूप प्रमाणात अडचणी आल्या. या कारचे अपेक्षेप्रमाणे विक्री होऊ शकली नाही. उदाहरण घ्यायचे ठरले तर मे महिन्यामध्ये या कारच्या केवळ 274 युनिटची विक्री झाली. त्यानंतर मात्र या गाड्या विक्री व्हाव्यात याकरिता मारुती सुझुकी या कंपनीने सवलतीत वाढ करून तब्बल ती अडीच लाख रुपये केली आहे.
मागच्या महिन्यामध्ये या कारवर दीड लाख रुपयांपर्यंतचे सवलत दिली जात होती व त्यामध्ये आता तब्बल एक लाख रुपयांची वाढ करत ती अडीच लाख रुपये करण्यात आलेली आहे. याबाबत आपण फायनान्शिअल एक्सप्रेसचा अहवाल बघितला तर त्यानुसार कारचे टॉप मॉडेल अल्फा वर अडीच लाख रुपयांपर्यंतची जास्तीत जास्त सूट उपलब्ध करण्यात आलेली आहे.
ही ऑफर कंपनीच्या माध्यमातून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही एडिशन करिता अवेलेबल आहे. या अडीच लाखांमध्ये एक लाख रुपयांची रोख तर दीड लाख रुपयांची जाहिरात वापर समाविष्ट करण्यात आलेली आहे व ही ऑफर फक्त मारुती सुझुकीचे स्मार्ट फायनान्स ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
त्यामध्ये एन्ट्री लेवल ट्रीम, Zeta, मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स ग्राहकांसाठी एक लाख रुपयांची रोख सवलत आणि एक लाख अतिरिक्त सूट देत आहे. प्रकारचे फायदे झेटा मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारांसाठी लागू आहे.
काय आहे या कारमध्ये खास?
या कारमध्ये 1462cc नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन असून जे निष्क्रिय स्टार्ट आणि स्टॉप फंक्शन आहे. हे इंजिन 103 बीएचपी पावर आणि 134.2 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच ते पाच स्पीड मॅन्युअल किंवा चार स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
जर मायलेज च्या बाबतीत मारुती सुझुकी या कंपनीचा दावा पाहिला तर जिम्नी मॅन्युअल 16.94 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते तर ऑटोमॅटिक व्हर्जन 16.39 पर किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते. तसेच या कार मध्ये फोर व्हील ड्राईव्ह ऑल प्रो सिस्टम देण्यात आलेली आहे. याशिवाय वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले आणि अर्काम्स द्वारे साऊंड सिस्टमसह नऊ इंच टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो.