Car News:- भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला तर झपाट्याने हे क्षेत्र विस्तारत असून अनेक नवनवीन कंपन्या आणि या क्षेत्रात अगोदरपासून दिग्गज समजल्या जाणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर एसयुव्ही सेगमेंट मधील कारची निर्मिती करत आहेत.
यासोबत आता इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत असताना महत्वाच्या असलेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील विकसित करण्यात येत आहेत. जर आपण कारनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकी ही एक नामांकित कंपनी आहे.

आजपर्यंत मारुती सुझुकीने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वैशिष्ट्यांनी युक्त अशा कार ग्राहकांना दिलेले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रावर राज करणाऱ्या या कंपनीने आता एसयूव्ही सेगमेंटवर लक्ष केंद्रित केले असून याच सेगमेंटमधील काही नवीन कार बाजारात आणण्याची तयारी मारुती सुझुकीने सुरू केली आहे. त्यामुळे मारुती सुझुकीकडून एसयुव्ही सेगमेंट मधील कार ग्राहकांच्या भेटीला आणल्या जातील हे मात्र निश्चित. यामध्ये अनेक वेगवेगळी फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत.
या येतील नवीन कार
1- नवीन सात सीटर प्रीमियम एसयूव्ही– मारुती प्रीमियम कॉलिटीची नवीन सात सीटर एसयूव्ही बाजारपेठेत येत असून ती कधी बाजारामध्ये येईल याबाबत मात्र मारुती सुझुकीने अद्याप खुलासा केलेला नाही. परंतु एक अंदाजानुसार जून 2024 पर्यंत ही कार बाजारात येऊ शकते.
या नवीन कारचे फिचर्स आणि इंजिन ग्रँड विटारा सारखे असण्याची शक्यता आहे. या नवीन 7 सीटर प्रीमियम एसयुव्ही कारमध्ये दीड लिटर, K15C आणि दीड लिटर हायब्रीड इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. या कारचे उत्पादन मारुती सुझुकीच्या खरखोदा प्लांटमध्ये करण्यात येणार आहे.
2-eVX एसयूव्ही– एवढेच नाहीतर मारुती सुझुकी येणाऱ्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक कार देखील आणण्याच्या तयारीत असून या इलेक्ट्रिक कारचे प्रोटोटाइप ऑटो एक्सपो 2023 मध्ये दिसले होते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 4.3 मीटर लांब असेल व या कारचे उत्पादन देखील सुरू झाले आहे. येणाऱ्या 2024 मध्ये सणासुदीच्या कालावधीत ही कार बाजारात येईल अशी शक्यता आहे.
3- नवीन स्विफ्ट आणि डिझायर– तसेच मारुती सुझुकीच्या माध्यमातून नवीन जनरेशनची स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर तयार करण्यात येणार आहे. या दोन्ही नवीन कार फेब्रुवारी आणि एप्रिल 2024 मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही कारचा विचार केला तर यामध्ये नवीन 1.2 लिटर, तीन सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिनसह येणार असून या कारला सीव्हीटी गिअरबॉक्स सोबत जोडण्यात येणार आहे. जर आपण या विषयीचा रिपोर्ट पाहिला तर त्यानुसार ही नवीन जनरेशनची स्विफ्ट कार एका लिटर पेट्रोलमध्ये 24.50 किलोमीटरचे मायलेज देईल असे देखील सांगण्यात आले आहे.