Car Update:- भारतामध्ये अनेक कंपनीच्या कार्स असून यामध्ये स्पोर्ट युटीलिटी व्हेईकल अर्थात एसयुव्ही सेगमेंट अतिशय वेगाने भारतीय बाजारपेठेमध्ये वाढताना दिसून येत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्यांच्या कार्स असून या स्पर्धेत आता टोयोटा देखील सब कॉम्पॅक्ट एस यु व्ही सेगमेंट मध्ये भारतीय बाजारपेठेत स्वतःचे नशीब आजमावणार असण्याची शक्यता आहे.
तसे पाहायला गेले तर टोयोटाच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेत आहेत परंतु आता भारतात टोयोटा ने Raize आणि Raize Space या दोन नव्या एसयूव्ही कार ट्रेडमार्क केल्या असून या दोन्ही प्रकारच्या एसयूव्ही पाच आणि सात सिटर अशा दोन पर्यायांमध्ये भारतीय बाजारपेठेत आणले जातील अशी एक शक्यता आहे.
ही नवीन एसयुव्ही टोयोटो साठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल किंवा एक ट्रम्प कार्ड ठरेल असे म्हटले जात आहे. ही एसयुव्ही आंतरराष्ट्रीय बाजारात याआधीच उपलब्ध आहे व जगभरात टोयोटा राईसची लांबी ही चार मीटर एवढी आहे.
टोयोटा राईसची वैशिष्ट्ये
तर जागतिक मार्केटचा विचार केला तर ही टोयोटा राईस उपलब्ध असून त्या ठिकाणी तिची लांबी 3995 मीटर रुंदी 1695 मी मी इतकी आहे. या कारची साईज कॉम्पॅक्ट असून देखील 17 इंचचे टायर या कारला देण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर या एसयूव्ही मध्ये 369 लिटरचा बूट स्पेस देण्यात आला असून जपानमध्ये 1.0 लिटरच्या टर्बो पेट्रोल इंजिनसह या कारची विक्री केली जाते.
परंतु जर ही कार भारतात आली तर एक पॉईंट पाच लिटर पेट्रोल इंजिन सह लॉन्च केली जाण्याची एक शक्यता आहे. तसेच या कारचे इंजन 100.6 पीएस पावर आणि 136 एन एम टॉर्क जनरेट करू शकते. जर आपण या कारच्या गेअर बॉक्स चा विचार केला तर या कारला ऑटोमॅटिक गेअर बॉक्स देण्यात आलेला असून पाच स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक अशा पद्धतीचा गिअरबॉक्स चा पर्याय देण्यात आला आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टोयोटा कंपनी या कारला सीएनजी व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. या कारची एकंदरी डिझाईन पाहिली तर यामध्ये फ्लॅट बोनेटसह ट्वीन एलईडी डीआरएल असून समोर क्रोम ट्रीटमेंटसह षटकोनी आकाराचे लोखंडी जाळी देखील आहे.
या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 210 मिमीचा असून मागील बाजूला स्प्लिट टेल लाईट्स व सी आकाराचा ब्रेक लाईट आहे. तसेच या कारला तीन इंजिन पर्याय देण्यात आले असून यामध्ये नियो ड्राईव्ह, सेल्फ चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रीड इलेक्ट्रिक आणि ई सीएनजी यांचा समावेश आहे. तसेच या कार मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले ला सपोर्ट करते. 360 डिग्री कॅमेरा व ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यामध्ये बघायला मिळते.
भारतामध्ये लॉन्च केली तर असे असू शकतात फीचर्स
सध्या ही कार भारतीय बाजारात लॉन्च नसून जर भारतात लॉन्च झाली तर यामध्ये काही ॲडव्हान्स फीचर्स समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. असे की यामध्ये ड्युअल एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रोम फ्रंट ग्रील तसेच नऊ इंचाचे टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, सनरूफ तसेच वायरलेस चार्जिंग, एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, टीएमटी कलर डिस्प्ले आणि लेझर रॅपिड स्टेरिंग यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.