Cheapest 7 Seater Car:- बऱ्याच व्यक्तींची स्वतःची कार घेण्याचे स्वप्न असते. जेव्हा कार घेण्याची योजना बनवली जाते तेव्हा प्रामुख्याने आपल्या बजेटनुसार कारची किंमत, त्या कारवर करावा लागणारा मेंटेनन्सचा खर्च आणि मायलेज इत्यादी गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात.
तसेच दुसरे म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य संख्याचा देखील विचार केला जातो. म्हणजेच कुठे बाहेर जाण्या येण्यासाठी संपूर्ण कुटुंब आरामात जाऊ शकेल अशा सात सीटर कारचा विचार बरेच व्यक्ती करताना आपल्याला दिसून येतात.

त्यामुळे अशा कार खरेदी करण्यासाठी बरेचजण बजेट देखील तयार करतात. परंतु अशा पद्धतीच्या कार मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बजेटच्या बाहेरच्या असतात. एक तर त्यांचे मायलेज कमी असते व मेंटेनन्स देखील जास्त असतो.
त्यामुळे अनेकांना सात सीटर कार घेण्याचे शक्य होत नाही. परंतु जर तुमचा देखील अशी कार घेण्याचा विचार असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आपल्याच देशांमध्ये एक सात सीटर कार अशी उपलब्ध आहे की ती तुम्हाला चांगला मायलेज देतेच परंतु तिची किंमत देखील आपल्या बजेटमध्येच आहे.
जर तुम्ही त्या कारच्या मेंटेनन्सचा विचार केला तर एका मोटरसायकलच्या मेंटेनन्स इतका फार फार तिला खर्च येत असतो. एक कुटुंबासाठी उत्कृष्ट अशी कार आहेच. परंतु टूर्स अँड ट्रॅव्हल सारख्या व्यवसायात देखील या कारचा चांगला उपयोग होऊ शकतो. शिवाय ही कार तुमच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत देखील असू शकते.
मारुती सुझुकीची इको(Eecco) ठरेल तुम्हाला फायद्याची
मारुती सुझुकीची इको कारबद्दल तुम्ही ऐकले असेल. ही एक मारुती सुझुकी कंपनीच्या कार पोर्टफोलिओ मधील एक खूप प्रसिद्ध अशी कार असून तिचा वापर तुम्ही खाजगी आणि व्यावसायिक कारणासाठी मोठ्या प्रमाणावर करू शकतात. तुम्हाला जे जे काही वैशिष्ट्य हवे असतात ते वैशिष्ट्ये या कारमध्ये दिलेले आहेत. जेव्हा मारुती सुझुकीची ओमनी ही कार बंद करण्यात आली त्यानंतर कंपनीने इको ही कार ग्राहकांच्या सेवेत सादर केली.
काय आहेत या कारचे वैशिष्ट्ये?
मारुती सुझुकी इकोमध्ये कंपनीने 1.2 लिटर नैसर्गिकरित्या एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन पेट्रोलवर 79.65 bhp आणि सीएनजी वर 70.67 bhp पावर जनरेट करते. एवढेच नाही तर या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.
मारुती सुझुकी इकोच्या मायलेज बद्दल विचार केला तर ती पेट्रोलवर २६ किमी प्रति लिटर आणि सीएनजी वर 32 किलोमीटर प्रतिकिलो इतके मायलेज देते. ही कार तुम्हाला पाच आणि सात सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
या कारचे इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
तसेच या व्यतिरिक्त या कारमध्ये तुम्हाला ड्युअल एअरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेंसर, म्युझिक सिस्टम, फ्रंट पावर विंडो, चाइल्ड लॉक, स्पीड सेन्सिंग लॉक यासोबतच अनेक वेगवेगळी फीचर्स मिळतात. अलीकडच्या कालावधीत कंपनीकडून ही कार अपडेट करण्यात आलेली आहे
व यानुसार आता डुएल टोनमध्ये फॅब्रिक सिटचा पर्याय मिळतो. जर आपण या गाडीचा मेंटेनन्स पाहिला तर एका वर्षाला चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच यानुसार एका महिन्याला पाचशे ते सहाशे रुपयांच्या आसपास मेंटेनन्स येतो.
किती आहे या कारची किंमत?
मारुती सुझुकी कंपनी या इकोचे चार प्रकार ग्राहकांसाठी ऑफर करते. जर तुम्ही बेस व्हेरियंटचा विचार केला तर ती पाच लाख 27 हजार रुपये( एक्स शोरूम ) किमतीत मिळते. जर टॉप व्हेरिएंटची किंमत पाहिली तर सहा लाख 53 हजार( एक्स शोरूम) इतकी आहे.