Cheapest CNG Cars : नवीन CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात मारुती आणि टाटाच्या स्वस्त CNG कारचा पर्याय उपलब्ध आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या किमती देखील 7 लाखांपेक्षा कमी आहेत.
आज मुंबईमध्ये CNG च्या किमती देखील कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे CNG कार वापरणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मारुती आणि टाटाचा सध्या CNG कार सेगमेंट मजबूत असल्याचे दिसत आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो
मारुती सुझुकी सेलेरियो तुमच्यासाठी एक उत्तम CNG कारचा पर्याय आहे. कारच्या VXI व्हेरियंटमध्ये CNG पर्याय देण्यात आला आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.73 लाख रुपये आहे. सेलेरियो CNG कार 35.6 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर
मारुती सुझुकी कार कंपनीकडून वॅगनआर कारचे CNG मॉडेल सादर केले आहे. वॅगनआर CNG कार 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहेत. वॅगन आर कारच्या LXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.45 लाख रुपये आहे तर VXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे.
टाटा टियागो
टाटा मोटर्सची टियागो CNG कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारच्या XE व्हेरियंटमध्ये CNG पर्याय देण्यात आला आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे. ही CNG कार 26.49 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो
मारुती सुझुकीची एस-प्रेसो कार देखील तुमच्यासाठी उत्तम CNG कारचा पर्याय आहे. S-Presso कारच्या LXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे तर VXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.12 लाख रुपये आहे. S-Presso CNG कार 32.73 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.