eBikeGo ने आणली नवीन वैशिष्ट्ये आणि आधुनिक डिझाईनची Muvi 125 5G इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा पूर्ण चार्ज कराल तर देईल 100 किमीची रेंज

Ajay Patil
Published:
muvi 125 5g electric scooter

देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसून येत आहे व यामध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक स्कूटर पासून तर बाईक आणि इलेक्ट्रिक कारपर्यंत वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही इलेक्ट्रिक वाहने खूप फायद्याची आहे.

त्यामुळे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक स्कूटर तसेच कार उत्पादित केल्या जात आहेत. याचप्रमाणे आता eBikeGo या कंपनीने देखील Muvi 125 5G इलेक्ट्रिक स्कूटर आणली असून तिचे नुकतेच बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर मध्ये अनावरण करण्यात आले. कंपनीने अतिशय आधुनिक डिझाईन आणि नवनवीन वैशिष्ट्येसह ही इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली असून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संपूर्णपणे ही स्कूटर विकसित करण्यात आलेली आहे.

Muvi 125 5G स्कूटरला एकदा चार्ज कराल तर देईल शंभर किमीची रेंज

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5 kW चा मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला असून या माध्यमातून कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर साधारणपणे 100 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच या स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले असून तुम्ही तीन तासापेक्षा कमी वेळेमध्ये तिला 80% पर्यंत चार्ज करू शकतात.

 या स्कूटरमध्ये असलेली महत्त्वाची वैशिष्ट्ये

रायडरला ही स्कूटर चालवताना पूर्णपणे डिजिटल अनुभव यावा यासाठी 5G मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटीसह स्मार्ट एलईडी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची रचना अतिशय सोपी असून देखभाल देखील खूप सोप्या पद्धतीने करता येते.

या स्कूटरचे वैशिष्ट्ये म्हणजे महिला  रायडर्स डोळ्यासमोर ठेवून तिचे डिझाईन आकर्षक असे तयार केले गेले आहे. त्यामुळे महिलांना देखील ही इलेक्ट्रिक स्कूट सहजपणे चालवता येणे शक्य आहे. याचाच अर्थ सध्याच्याज्या पेट्रोल स्कूटर आहेत त्यापेक्षा या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन अतिशय हलके आहे.

 किती असेल किंमत?

कंपनीच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत आणि डिलिव्हरी याबाबत अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु शहरांमध्ये चालवण्यासाठी ही स्कूटर खास करून तयार करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe