Electric Bike: ओकायाची स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक आहे जबरदस्त! 100 किमी प्रवासाचा खर्च येईल 25 रुपये, वाचा या बाईकची किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
ferreto disruptor electric bike

Electric Bike:- सध्या हळूहळू इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे ट्रेंड वाढताना दिसून येत असून दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक स्कूटर ची मागणी वाढू लागलेली आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीकडे वळल्या असून यामध्ये वेगवेगळ्या कार्स तसेच इलेक्ट्रिक टू व्हीलरचे उत्पादन करू लागले

असून वेगवेगळ्या किंमतीत अनेक वेगवेगळे वैशिष्ट्यांसहित या बाईक बाजारपेठेमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. अगदी याच पद्धतीने ओकाया या कंपनीने देखील अलीकडेच स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक Ferrato Disruptor ही आकर्षक डिझाईन आणि अनोख्या अशा फीचर्ससह लॉन्च केली आहे. याच इलेक्ट्रिक बाइकची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 ओकायाची इलेक्ट्रिक Ferrato Disruptor इलेक्ट्रिक बाइकची वैशिष्ट्ये

ओकायाने अलीकडेच स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक फेरेटो डिसरप्टर ही बाईक लॉन्च केली असून तिचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन आणि अनोखे फीचर्समुळे ती ग्राहकांमध्ये पसंती उतरताना दिसून येत आहे. ही एक की कीफायतशिर बाईक असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून केला गेला असून जे कर्मचारी  ऑफिस किंवा जे विद्यार्थी कॉलेजला जातात त्यांच्या करीता ही बाईक वापरणे खूप योग्य ठरू शकते.

या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती देताना ओकायाने म्हटले आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक बाइक 25 पैशांच्या खर्चामध्ये एक किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच 100 किलोमीटर प्रवास करायचा असेल तर याला 25 रुपये खर्च येईल. समजा तुम्हाला दररोज पन्नास किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर या बाईकने तुम्ही 12.5 रुपये खर्च येईल व 25 किलोमीटर अंतर कापण्याकरिता सहा रुपये 25 पैसे खर्च येईल.

त्यामुळे आपल्याला यावरून दिसून येते की ही बाईक वापरण्याचा खर्च हा अगदी कमीत कमी आहे. जर आपण या बाईकचे वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये 3.97 kWh LFP बॅटरी देण्यात आलेली असून ती बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 29 किलोमीटरचे रेंज देईल असा देखील दावा कंपनीने केला आहे व या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड प्रतितास 95 किलोमीटर इतका आहे.

ओकायाची ही इलेक्ट्रिक बाइक 6.37 kW जी पावर आणि 228 एनएम टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक बाइकच्या रनिंग कॉस्टबद्दल माहिती देताना कंपनीने दावा केला आहे की तिचे रनिंग कॉस्ट फक्त 25 पैसे प्रति किलोमीटर इतकी आहे.

तसेच दररोज ही बाईक 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने चालवली तर खूप चांगली ड्रायव्हिंग रेंज या बाईकच्या माध्यमातून मिळू शकते. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक बाइक अगदी पेट्रोल बाईक सारखेच दिसते. या बाईकमध्ये संपूर्ण डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेले असून दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध आहे.

 किती आहे या इलेक्ट्रिक बाइकची किंमत?

ओकायाच्या या फेरेटो डिसरॅप्टर इलेक्ट्रिक बाइकची किंमत एक लाख साठ हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe