Electric Nano Car: स्वस्तामध्ये इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पूर्ण करेल का टाटा नॅनो? काय आहे यामागील सत्य बाजू? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
electric car update

Electric Nano Car:-सध्या इलेक्ट्रिक वाहनांची रेलचेल असून अनेक कार आणि दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा कल हा आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे.

तसेच अनेक प्रसिद्ध कार निर्मिती कंपन्यांचा विचार केला तर त्यांनी देखील अनेक इलेक्ट्रिक सेगमेंटच्या कार बाजारपेठेत दाखल केलेले आहेत व याला टाटा मोटर्स देखील अपवाद नाही. टाटाने देखील अल्टो तसेच टियागो व टिगोर तसेच सफारी सारख्या अनेक इलेक्ट्रिक सेगमेंटच्या कार बाजारात उतरवले आहेत.

परंतु जर आपण इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पाहिली तर ती जास्त असल्यामुळे बऱ्याच व्यक्तींना ही किंमत परवडणारी नाही. परंतु या दरम्यानच सोशल मीडियाच्या माध्यमातून टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार येणार याविषयीची जोरदार चर्चा रंगू लागली असून नेमकी खरंच टाटा नॅनो इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये येणार आहे का? काय आहे यामागील सत्यता हे देखील तपासून पाहणे तितकच गरजेचे आहे.

 टाटा नॅनो ईव्ही होईल बाजारपेठेत दाखल?

सर्वसामान्यांना कारमधून फिरता यावे याकरिता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी स्वस्तामध्ये टाटा नॅनो उपलब्ध करून दिली होती व तिचे कौतुक देखील तितकेच झाले होते. परंतु काही कारणास्तव कालांतराने या कारचे उत्पादन थांबवावे लागले होते. परंतु आता इलेक्ट्रिक वाहनांच्या युगामध्ये नॅनो देखील इलेक्ट्रिक वर्जन मध्ये दाखल होत असल्याचा दावा अनेक सोशल मीडिया मधून करण्यात येत आहे.

टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार विषयी जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सध्या सुरू असून या गाडीची वैशिष्ट्ये तसेच तिची किंमत व अगदी लूक इत्यादीबाबत बऱ्याच पोस्ट व्हायरल देखील झाले आहेत. यामध्ये ही कार एक नवीन रूपात येत असल्याचा दावा देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

इतकेच नाहीतर ही कार दोन ते तीन लाखांपर्यंत मिळेल असा देखील दावा या पोस्टमध्ये करण्यात येत आहे. परंतु ज्या कारचा फोटो या वायरल पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे तो toyota Aygo hatchback या कारचा असून ही कार भारतात विक्री होत नाही. या कारचे उत्पादन जपानची कार उत्पादक कंपनी करते व या कार मध्ये 998 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे.

 पण मग इलेक्ट्रिक नॅनोचे काय?

जर आपण नॅनो कारच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटचा विचार केला तर ही कार देखील बाजारपेठेत येण्याची दाट शक्यता असून एका रिपोर्टचा विचार केला तर त्यानुसार टाटा कंपनी टाटा नॅनोच्या X3 प्लॅटफॉर्मचा वापर ईव्ही आवृत्ती करिता करू शकते. कारण भारतामध्ये सध्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारची मागणीत वाढ होत असून स्वस्तामध्ये इलेक्ट्रिक कार विक्रीसाठी मोठी संधी आहे.

त्यामुळे टाटा कंपनी त्यावर विचार करत असल्याचे देखील समोर आले आहे. प्राप्त रिपोर्टनुसार  भविष्यामध्ये येऊ शकणाऱ्या कार मध्ये दमदार लिथियम आयन बॅटरी पॅक असेल व दोन बॅटरी पॅकचा पर्याय यामध्ये मिळू शकणार आहे. एकदा बॅटरी फुल चार्ज झाली तर ही 250 किमी पर्यंतचे अंतर कापू शकणार आहे  व जास्त क्षमतेची बॅटरी असेल तर 315 किलोमीटर पर्यंत ही जाऊ शकणार आहे.

एवढेच नाहीतर या कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग असेल व एसी, फ्रंट पावर विंडो तसेच ब्लूटूथ आणि मल्टी इन्फॉर्मेशनल डिस्प्ले देखील असेल. तसेच या होऊ घातलेल्या कारमध्ये रिमोट लॉकिंग सिस्टम अँड्रॉइड ऑटोचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. सात इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील असू शकते. परंतु आता येणाऱ्या काळात खरंच टाटा नॅनो ईव्ही सेगमेंट मध्ये येईल का? हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe