Electric Scooter : देशात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचा क्रेझ पाहून तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यात आला आहे . जे तुम्हाला 100 किमी रेंज देतो.
तुम्ही हा दमदार इलेक्ट्रिक स्कूटर ऑफरचा फायदा घेत एकही रुपया न देता बुक करू शकतात. होय, कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट ऑफर आणला आहे ज्यामध्ये तुम्ही 100 किमी रेंज देणारा हा इलेक्ट्रिक स्कूटर फ्रीमध्ये बुक करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि काही दिवसापूर्वी ऑटो एक्सपोमध्ये वॉर्डविझार्डच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड Joy e-Bike ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Mihos लाँच केली होती. आता कंपनीकडून याची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. 22 जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे ग्राहकांना बुकिंग करता येणार आहे. ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने ही स्कूटर 1.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. मात्र, ही किंमत पहिल्या 5,000 ग्राहकांसाठीच लागू असेल. आकर्षक लूक आणि पावरफुल इलेक्ट्रिक मोटरने सजलेली ही स्कूटर अतिशय मजबूत बनवण्यात आली आहे.
या स्कूटरची बॉडी निर्माण करण्यासाठी पॉली डायसायक्लो पेंटाडीन (पीडीसीपीडी) वापरण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे, ज्यामुळे ती खूप मजबूत आहे. या स्कूटरच्या लॉन्चिंगदरम्यान कंपनीने त्याच्या बॉडीवरवर हातोडा मारून आपली ताकद दाखवून दिली होती. याशिवाय नवीन मिहोसमध्ये स्मार्ट आणि आरामदायी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
आकाराच्या बाबतीत, स्कूटरची लांबी 1,864 मिमी, रुंदी 700 मिमी आणि उंची 1,178 मिमी आहे. याचा व्हीलबेस 1,360 मिमी आहे. याशिवाय समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे भारतीय रस्ते लक्षात घेऊन डिझाइन केले आहे, या स्कूटरला 175 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, या स्कूटरला साइड स्टँड सेन्सर, हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी फीचर्स आहेत.
बॅटरी पॅक आणि रेंज
MIHOS मध्ये, कंपनीने 2.5 kWh क्षमतेचा Li-Ion बॅटरी पॅक वापरला आहे, जो एका चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो. या स्कूटरमध्ये दिलेली 1500W इलेक्ट्रिक मोटर 95 Nm चा टॉर्क जनरेट करते, जरी तिचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीचा दावा आहे की सामान्य घरगुती चार्जरने त्याची बॅटरी अवघ्या 4 तासांत पूर्ण चार्ज होते. नवीन स्कूटर पिक-अपच्या बाबतीतही चांगली आहे, ही स्कूटर 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 7 सेकंदात पकडते.
फीचर्स
कंपनीने Mihos मध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत, तुम्ही या स्कूटरला कंपनीच्या समर्पित अॅपद्वारे ब्लूटूथद्वारे तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. या स्कूटरच्या बॅटरीची स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला स्कूटरचा डिस्प्ले पाहण्याची गरज नाही, तर तुम्ही ती रिमोटली तपासू शकता. यात रिव्हर्स मोड देखील आहे, ज्यामुळे पार्किंग सोपे होते. जीपीएस सेन्सिंग, रिअल टाइम पोझिशनिंग, जिओ फेन्सिंग तुमची राइड आरामदायी बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.
हे पण वाचा :- iPhone 14 Pro Max वर सर्वात मोठी सूट! आता होणार हजारोंची बचत ; ऑफर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल