Electric Tractor: शेतकऱ्यांना आता नाही डिझेलची चिंता! बिना गिअरचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च

Ajay Patil
Published:

Electric Tractor:- कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीची पूर्व मशागतीसाठी आवश्यक नांगरण्यापासून तर रोटावेटर आणि पिकांच्या पेरणीसाठी देखील अनेक ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र विकसित झाल्यामुळे ट्रॅक्टरचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी देखील ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या मदतीला धावते.

या पद्धतीने शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापरमोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु जर आपण काही वर्षांचा विचार केला तर डिझेलचे भाव वाढल्यामुळे  शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापर म्हणावा तेवढा परवडत नाही. या पार्श्वभूमीवर आता  ऑटोमोबाईल उद्योग देखील झपाट्याने बदलत असून आता अनेक वाहने बॅटरीवर म्हणजेच विजेवर धावू लागले आहेत.

अनेक प्रकारच्या दुचाकी पासून ते कार आणि आता ट्रॅक्टर देखील इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये अवतरले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांची डिझेलच्या खर्चापासून मुक्तता होईल यात शंकाच नाही.

 सोलीस इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडने आणले बाजारपेठेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

बाजारामध्ये आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करण्याच्या तयारीत असून आता देशातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महागड्या डिझेल पासून शेतकऱ्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे. या अनुषंगाने सॉलीस इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडने देखील इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात लॉन्च केले असून भारतात मात्र अजून त्याचे आगमन होण्यास उशीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या मात्र ते उत्तर अमेरिका आणि युरोप देशांसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे. या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य म्हणजे याला गिअरची गरज नसून हे ट्रॅक्टर बिना गिअरचे तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे घरातील कुठलाही सदस्य याला सहजपणे चालवू शकतो. या ट्रॅक्टरचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा स्पीड एकदा सेट केला की ते त्या स्पीडने धावत राहते. त्यासोबतच त्याचा वेग वाढवता देखील येतो व कमी देखील करता येतो

हे विजेवर चालणारे ट्रॅक्टर असल्यामुळे त्याला आता पेट्रोल किंवा डिझेलची गरज भासणार नाही. अगदी घरातील घरगुती विद्युत उपकरणांसारखेच हे ट्रॅक्टर असून याला फक्त विजेची गरज भासते. या ट्रॅक्टरचे लॉन्चिंग भारतात झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेलच्या खर्चामध्ये बचत होण्यास मदत होणार आहे  व साहजिकच शेतीतून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होईल.

 या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची महत्त्वाची वैशिष्ट्ये

हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून त्याची किंमत देखील खूप कमी आहे असे म्हटले जात आहे. तसेच पूर्ण चार्ज होण्यासाठी हे ट्रॅक्टर 20 युनिट विजेचा वापर करेल व साधारणपणे हा खर्च 100 रुपयापर्यंत येऊ शकतो. परंतु पूर्ण चार्ज झाल्यानंतर शेतामध्ये सहा तास पर्यंत काम करण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे. या तुलनेमध्ये जर डिझेल ट्रॅक्टरचा विचार केला तर सहा तास काम करायला सहा लिटर डिझेल लागते व त्याचा खर्च पाचशे रुपयांपेक्षा जास्तीचा येतो. परंतु हेच काम या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने केले तर सहा तास काम करण्यासाठी तुम्हाला फक्त शंभर रुपये इतका खर्च येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe