Electric Tractor:- पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता जगातील बऱ्याच प्रकारच्या ऑटोमोबाईल कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहने विकसित केले जातील. यामध्ये बस, कार तसेच स्कूटर आणि शेतकऱ्यांच्या अतिशय जवळचे असणारे ट्रॅक्टर देखील आता इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतातील काही कंपन्यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्चिंगची तयारी सुरू केलेली आहे. यामध्ये सोनालिका आणि इतर काही महत्त्वाच्या कंपनीचा समावेश आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देशात तीन नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च होणार असून ही ट्रॅक्टर हे उच्चतम कामगिरी आणि जास्त वजन उचलण्याची क्षमता यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.
हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर होतील लॉन्च
1- मुरुगप्पा ग्रुप( इलेक्ट्रिक ट्रॅक्टर)- जर आपण मुरगप्पा ग्रुपचा विचार केला तर भारतामध्ये बऱ्याच वर्षापासून व्यापार क्षेत्रामध्ये प्रगत असा ग्रुप आहे. खास करून बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये हा ग्रुप महत्त्वाचा असून या ग्रुपची सुरुवात दक्षिण भारतात सर्वप्रथम झाली होती. आज जर आपण मुरगप्पा ग्रुपचे कंपनी व्हॅल्युएशन पाहिले तर ते 742 बिलियन रुपयांपर्यंत आहे. मुरगप्पा ग्रुप हा एग्रीकल्चर सोल्युशन तसेच फायनान्शिअल सर्विस, इंजीनियरिंग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो.
आता काही दिवसा अगोदर मुरगप्पा ग्रुपने सेलस्टीयल ई मोबिलिटी या कंपनीला खरेदी केले आहे व ही कंपनी ऑटोमोबाईल डिझाईन तसेच मॅन्युफॅक्चरिंग व बॅटरी डिझाईन मध्ये खूप प्रसिद्ध अशी आहे. ही कंपनी मार्च 2024 पर्यंत तीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. ही तीनही ट्रॅक्टर खूप महत्त्वाची वैशिष्ट्ये तसेच प्रगत बॅटरी व शेतीसाठी उपयुक्त अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असतील.
2- सोनालीका ट्रॅक्टर– सोनालिका हे नाव भारतातील शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध व परिचित असा ट्रॅक्टर ब्रँड आहे. या ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध असे ट्रॅक्टर आहे. सोनालिका कंपनी ही 1996 मध्ये स्थापन करण्यात आली व त्यानंतर बाजारपेठेवर या कंपनीने वर्चस्व स्थापन केलेले आहे.
सोनालिका कंपनी देखील आता सोनालीका टायगर हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केले आहे. यामध्ये जर्मन डिझाईन मोटर लावलेली असून तिच्यामध्ये 11kW पावर क्षमता देण्यात आलेली आहे. तसेच 250-350A ची बॅटरी देखील देण्यात आलेली असून ते दहा तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. तर तुम्ही फास्ट चार्जर च्या साह्याने चार्ज केले तर फक्त चार तासात पूर्ण चार्ज होते. हे ट्रॅक्टर 500 किलोग्राम पर्यंत वजन उचलू शकते. अशाप्रकारे हे ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे.
3- ऑटोनेक्स्ट(AutoNext)ऑटोमेशन– केल्या काही दिवसा अगोदर ऑटोनेक्स्ट ऑटोमेशनने एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सादर केले होते व या ट्रॅक्टरचे नाव आहे X45H2. हे ट्रॅक्टर 32KW च्या पावर क्षमतेमध्ये असून यामध्ये 38.4KWh ची उत्तम बॅटरी देण्यात आलेले आहे. हे ट्रॅक्टर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर आठ तास न थांबता काम करू शकते. यामध्ये हायड्रोलिक स्टेरिंग चा वापर करण्यात आलेला असून या माध्यमातून एक आरामदायी आणि स्मूथ ड्राईव्हचा अनुभव मिळतो. हे ट्रॅक्टर 2024 पर्यंत बाजारपेठेत येईल अशी शक्यता आहे.