Citroen C3 Aircross : कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ज्यांना सेव्हन सीटर कार खरेदी करायची आहे अशांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, भारतीय बाजारात आज एक सेव्हन सीटर कार लॉन्च झाली आहे.
प्रसिद्ध फ्रेंच कंपनी Citroen ने आज सेव्हन सीटर ऑटोमॅटिक कार लॉन्च केली आहे. खरे तर कंपनीने आधीच लॉन्च केलेल्या C3 Aircross चे ऑटोमॅटिक (AT) वॅरियंट भारतीय बाजारात आज लॉन्च केले आहे. Citroen C3 Aircross दोन ट्रिम्स प्लस आणि मॅक्स या दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हे ऑटोमॅटिक वर्जन एर्टिगा या लोकप्रिय एसयूव्ही कार सोबत स्पर्धा करणार आहे. पण ही गाडी एर्टिगाचा बाजार उठवणार का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. एर्टिगा ही देशातील एक लोकप्रिय कार आहे.
ही कार तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. दरम्यान या कारला टक्कर देण्यासाठी बाजारात आज C3 एअर क्रॉस या कारचे ऑटोमॅटिक वर्जन लॉन्च करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण नव्याने लॉन्च झालेल्या या ऑटोमॅटिक वॅरियंटच्या मॉडेलची तपशीलवार माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे इंजिन :- कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, Citroen C3 Aircross ऑटोमॅटिक प्रकारात ग्राहकांना 1.2L 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कारचे इंजिन 110bhp ची कमाल पॉवर आणि 15 ते 205 Nm पर्यंतचे पीक टॉर्क जनरेट करणार असा दावा कंपनीने केला आहे.
कसे राहणार एक्सटेरियर आणि इंटेरियर:- Citroen C3 Aircross ऑटोमॅटिक प्रकारांमध्ये एक्सटेरियर आणि इंटेरियर मध्ये कोणताच बदल झालेला नाही. या गाडीचे एक्सटेरियर आणि इंटेरियर आधी सारखेच कायम ठेवण्यात आले आहे.
काय किंमत राहणार ? :- या Citroen C3 Aircross ची सुरुवातीची किंमत 12.85 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. पण नव्याने लॉन्च झालेल्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत मॅन्युअल वेरिएंटपेक्षा अधिक आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत ही मॅन्युअलपेक्षा 1.30 लाख रुपये जास्त ठेवण्यात आली आहे.
कंपनीने Citroen C3 Aircross AT Max व्हेरिएंट 5-सीटरची किंमत 13.50 लाख रुपये आहे तर 7-सीटरची किंमत 13.85 लाख रुपये एवढी आहे. पण या सिट्रोएन कारचे बुकिंग 25,000 रुपयांच्या टोकन रकमेने सुरू झाले आहे. आम्ही वर नमूद केलेली किंमत एक्स शोरूम किंमत आहे. म्हणजेच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. तसेच या गाडीची डिलिव्हरी ही पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.