सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा ट्रेंड वाढताना आपल्याला दिसून येत आहे व यामध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या काही वाढत्या किमती आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहने हे खूप फायद्याचे असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन दिले जात आहे.
त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या विविध प्रकारच्या कार तसेच दुचाकी व इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात देशात सध्या लॉन्च करत आहेत.
अगदी याच प्रमाणे फुजियामा या कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देशांमध्ये लॉन्च केली असून ती दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे व यातील पहिला प्रकार म्हणजे फुजीयामा थंडर प्लस आणि दुसरा म्हणजे फुजीयामा ईव्ही थंडर LI हा होय. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही प्रकारांची माहिती आपण या लेखात बघू.
फुजियामाने लॉन्च केली दोन प्रकारात इलेक्ट्रिक स्कूटर
फुजीयामा कंपनीने भारतात दोन प्रकारांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली असून हे दोन्ही प्रकार अतिशय महत्वाचे फीचर्स असलेले आहेत…..
1- फुजीयामा थंडर व्हीएलआरए– कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 वॅटच्या मोटारचा वापर केला असून ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे व हिचा स्टॉप स्पीड 25 किलोमीटर पर हवर इतका आहे.
कंपनीच्या माध्यमातून या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 48V 28AH व्हीएलआरए बॅटरी पॅक दिलेला आहे. या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे ही कमी वेग असलेली इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे या स्कूटरला चालवण्याकरिता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची किंवा नोंदणीची गरज नाही.
2-फुजीयामा थंडर एलआय– ही देखील कमी स्पीड असलेल्या प्रकारातील स्कूटर असून या स्कूटरमध्ये देखील 250 वॅटची मोटर वापरण्यात आली असून ती ताशी 25 किलोमीटर वेगाने धावते. ही स्कूटर जर पूर्ण चार्ज केली तर 90 किलोमीटरची रेंज देते व या स्कूटरमध्ये 60V 30AH डीएलआरए बॅटरी वापरात आली असून ती पूर्ण चार्ज होण्याकरता चार ते पाच तास लागतात.
या दोन्ही प्रकारांमध्ये असलेली महत्वाची वैशिष्ट्ये
या दोन्ही स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलाईट, रिमोट लॉक आणि अनलॉक फिचर उपलब्ध आहे व त्याशिवाय अँटी थेप्ट अलर्ट देखील उपलब्ध आहे.
किती आहे किंमत?
फुजीयामा कंपनीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या ईव्ही थंडर LI व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 64 हजार 990 रुपये इतकी आहे.