Best Family Car:- या दिवाळीच्या कालावधीमध्ये तुम्हाला देखील तुमच्या फॅमिली करिता सात सीटर कार घ्यायची असेल तर बाजारामध्ये असे विविध कंपन्यांचे सात सीटर कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत.त्यामुळे तुमचा बजेट पाहून तुम्ही सात सीटर कार खरेदी करू शकतात.
परंतु बहुतांशी सात सीटर कारच्या किमती पाहिल्या तर त्या जास्त असल्यामुळे कित्येकदा त्या बजेटच्या बाहेर जातात. परंतु तुम्हाला जर दहा लाख रुपये पेक्षा कमी किमतीत सात सीटर कार हवी असेल व ती ही उत्तम फीचर्स असलेली तर या लेखामध्ये आपण अशा काही कारची माहिती घेऊ ज्या तुम्ही दहा लाख रुपये पेक्षा कमी किमतीत खरेदी करून तुमचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
या आहेत परवडणाऱ्या किमतीतील सात सीटर कार
1- महिंद्रा बोलेरो– महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो ही कार प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध असून ती तिची मजबुती करिता प्रामुख्याने ओळखली जाते. या कारमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले असून तिचे मायलेज देखील उत्तम असते. या कारची सुरुवातीची किंमत नऊ लाख रुपये आहे व त्यामुळे ती बजेट मधील कार आहे.
2- मारुती सुझुकी एर्टिगा– ही कार देखील तिच्या उत्तम वैशिष्ट्यांकरता प्रामुख्याने ओळखली जाते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये सध्या उपलब्ध असून या कारमध्ये तुम्हाला एबीएस आणि एअरबॅग सारखे सुरक्षितता वैशिष्ट्ये मिळतात.
तसेच स्मार्ट प्ले इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फिचर्स देखील उपलब्ध आहे. या कारची किंमत आठ लाख ते दहा लाख रुपयांच्या दरम्यान असून ही बजेट फ्रेंडली कार म्हणून ओळखली जाते.
3- रेनॉल्ट ट्रायबर– ही सात सीटर कार सेगमेंट मधील उत्कृष्ट अशी कार आहे. या कारमधील असलेले मॉड्युलर सीटिंग अरेंजमेंट आणि स्मार्ट इंटेरियर्स या कारला आणखीनच खास बनवते.
या कारमध्ये 1.0- लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आली असून या कारची किंमत पाच लाख 50 हजार रुपयांपासून सुरू होते. या कारचे मायलेज देखील उत्तम असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही कार एक उत्तम पर्याय आहे.
4- मारुती इको– मारुती सुझुकी कंपनीची इको ही कार देखील खूप लोकप्रिय अशी कार असून ही बजेट फ्रेंडली कार म्हणून ओळखली जाते. या कारची किंमत पाच लाख बत्तीस हजार रुपयांपासून ते सहा लाख 58 हजार रुपये दरम्यान आहे. कमीत कमी किमतीत चांगलेत चांगले वैशिष्ट्ये व उत्तम मायलेज करिता ही कार प्रामुख्याने लोकप्रिय आहे.
5- महिंद्रा बोलेरो निओ– महिंद्रा कंपनीची बोलेरो निओ ही कार देखील सात सीटर कार सेगमेंट मधील लोकप्रिय अशी कार असून या कारची किंमत नऊ लाख 95 हजार ते बारा लाख पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार देखील कुटुंबासाठी एक चांगला पर्याय आहे.