7 Seater Car:- साधारणपणे पोळा ते गणेश चतुर्थीच्या म्हणजेच श्री गणेशाच्या आगमनानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सणासुदीचा कालावधी सुरू होतो व जणू काही सणांचा पाऊसच भारत वर्षांवर होत असतो. या सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक शुभ मुहूर्त असल्याने अनेक जण नवीन वाहने खरेदी करण्याला यामध्ये प्राधान्य देतात.
गणेश चतुर्थी असो किंवा घटस्थापना आणि भारतातील सगळ्यात महत्त्वाचा असलेला सण दिवाळी असून या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहने खरेदी करण्याकडे आपल्याला बऱ्याच लोकांचा कल दिसून येतो.
त्यामुळे तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये तुमच्या कुटुंबाकरिता आरामदायी अशी सात सीटर कार घ्यायचा प्लान असेल तर कार मार्केटमध्ये अनेक चांगले कार उपलब्ध आहेत.
यामध्ये तुमचा बजेट जर सहा लाख रुपये पर्यंत असेल तर रेनॉल्ट कंपनीची एक कार तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल. कारण ही कार तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये देखील मिळेल व तुमच्या अपेक्षा देखील पूर्ण करेल.
रेनॉल्ट ट्रायबर ठरेल तुमच्यासाठी उत्तम कार
तुमचा बजेट जर सहा लाख रुपये पर्यंत असेल व तुम्हाला कुटुंबासाठी उत्तम अशी फीचर्स असलेली सात सीटर कार घ्यायची असेल तर रेनॉल्ट ट्रायबर ही एमपीव्ही सात सीटर कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. ही कार तुम्ही कुठलाही विचार न करता घेऊ शकतात.
कसे आहे या कारचे इंजिन?
रेनॉल्ट ट्रायबर या कारमध्ये 1.0- लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 27 पीएस आणि 96 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच ही कार पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय सहित येते.
तसेच वीस किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्यास ही कार सक्षम आहे. या कारमध्ये 84 लिटरची बूट स्पेस देण्यात आली असून पाच मोनो टोन आणि पाच ड्युअल टोन रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
काय आहेत रेनॉल्ट ट्रायबरमध्ये असलेली वैशिष्ट्ये?
या कारमध्ये आठ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटी, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप, सेंटर कन्सोलमध्ये कुल्ड स्टोरेज, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सहा वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एलईडी टर्न इंडिकेटर तसेच प्रोजेक्टर हेडलॅम्प,
फोन कंट्रोल तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी एसी वेंट्स उपलब्ध आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारच्या समोर आणि बाजूला असे मिळून चार एअरबॅग्स देण्यात आलेले आहेत. एबीडी सह एबीएस, मागील पार्किंग सेन्सर आणि रियर कॅमेरा देखील यामध्ये देण्यात आलेला आहे.
किती आहे या कारची किंमत?
रेनॉल्ट ट्रायबर या कारची किंमत पाच लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.