आर्मी, पॅरा मिलिटरी फॉर्सेस आणि राज्य पोलिसांना निसान मॅग्नाइट कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! मिळेल मोठा डिस्काउंट

26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने देशातील पॅरामिलिटरी फॉर्सेस तसेच आर्मी व पोलिसांकरीता निसान मॅग्नाइटच्या माध्यमातून बोल्ड फॉर द ब्रेव्ह नावाची एक खास ऑफर लॉन्च करण्यात आलेली आहे व या अंतर्गत निसान मॅग्नाइट एसयूव्ही वर बंपर अशी सवलत दिली जात आहे.

Ajay Patil
Published:
nissan magnite car

Bold For The Brave Offer:- 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने देशातील पॅरामिलिटरी फॉर्सेस तसेच आर्मी व पोलिसांकरीता निसान मॅग्नाइटच्या माध्यमातून बोल्ड फॉर द ब्रेव्ह नावाची एक खास ऑफर लॉन्च करण्यात आलेली आहे व या अंतर्गत निसान मॅग्नाइट एसयूव्ही वर बंपर अशी सवलत दिली जात आहे.

सीएसडी पोर्टलच्या माध्यमातून आर्मी ऑफिसर्स या कारच्या खरेदीवर ७२ हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंत पैशांची बचत करू शकतात व निसान कंपनीच्या कोणत्याही डीलरशिपमधून पॅरा मिलिटरी फोर्सेस आणि पोलीस 23 हजार रुपयापर्यंत बचत करू शकतात. या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर शेवटची मुदत 31 जानेवारी 2025 आहे.

कशा पद्धतीने दिले जातील हे फायदे?
देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निसान मोटार इंडियाच्या माध्यमातून एक विशेष ऑफर लॉन्च करण्यात आलेली आहे व या ऑफरचा फायदा एअर फोर्स, नेव्ही तसेच सेंट्रल पॅरा मिलिटरी फॉर्सेस व स्टेट पोलीस फोर्सच्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.

निसान मोटर इंडियाच्या माध्यमातून ही ऑफर कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही मेगनाईटवर दिली जात आहे. आर्मी मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी सीएसडी एएफडी पोर्टलवर जर बुकिंग केले तर त्यांना ही ऑफर देण्यात येणार आहे

व त्यासोबत सीएसडी अंतर्गत करामध्ये देखील सुट मिळणार आहे. तसेच पॅरा मिलिटरी फोर्स मधील आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ही ऑफर निसान मोटरच्या कोणत्याही डीलरशिपवर उपलब्ध आहे.

कुणाला किती मिळेल फायदा?
आर्मी ऑफिसर्स करिता निसान मॅग्नाइट MT VISIA ची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार 100 रुपये आहे. परंतु सीएसडी वरची किंमत पाच लाख 27 हजार रुपये आहे. म्हणजेच आर्मी ऑफिसर्सना या कारवर 72 हजार 156 रुपयांची सूट मिळणार आहे.

तसेच निसान मेगनाईट MT ACENTA ची किंमत सात लाख 14 हजार 400 रुपये आहे व सीएसडीवर तीची किंमत सहा लाख 29 हजार 72 रुपये आहे. म्हणजेच या कार खरेदीवर आर्मी ऑफिसर्सना 84 हजार 928 रुपयांची बचत करता येणार आहे.

एवढेच नाही तर MT N-CONNECTA ची किंमत सात लाख 80 हजार रुपये आहे व सीएसडी किंमत सहा लाख 93 हजार 776 रुपये आहे व यानुसार या कारवर 92 हजार 224 रुपयांची बचत होणार आहे.

तसेच MT TEKNA च्या खरेदीवर एक लाख एक हजार तीनशे तेहतीस रुपयांची बचत करता येणार आहे( या सर्व किमती एक्स शोरूम आहेत)

राज्य पोलिसांना कसा मिळेल फायदा?
निसान मॅग्नाइट एमटी व्हिसियाची किंमत पाच लाख 99 हजार चारशे रुपये आहे. परंतु ही कार ऑफर अंतर्गत राज्य पोलीस दलातील कर्मचारी व सेंट्रल पॅरा मिलिटरी फॉर्सेस यांना पाच लाख 88 हजार शंभर रुपयांना मिळणार आहे. MT ACENTA ची किंमत सात लाख 14 हजार आहे व ही कार 6 लाख 94 हजार पाचशे रुपयांना मिळणार आहे.

MT N-CONNECTA ची एक्स शोरूम किंमत सात लाख 86 हजार रुपये आहे व ही पोलीस वेल्फेअर स्टोअर्स मध्ये सात लाख 63 हजार रुपयांना उपलब्ध आहे. तसेच MT TEKNA या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 75000 आहे व ही कार सेंटर पोलीस वेल्फेअर स्टोअर्समध्ये आठ लाख 52 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe