New Car Launching : नवीन वर्षात कार घेऊ जेवळी इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षाच्या अगदी सुरवातीलाच देशातील ऑटो क्षेत्रातील दोन प्रमुख कंपन्या नवीन कार लॉन्च करणार आहेत.
जानेवारीमध्ये या दोन नवीन कार लॉन्च होणार अशी माहिती समोर आली आहे. यामुळे या चालू महिन्यात ज्या लोकांना नवीन कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
दरम्यान, आता आपण देशातील कोणत्या दोन ऑटो दिग्गज कंपन्या नवीन कार लॉन्च करतील याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किया : किया या कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. दरम्यान ही कंपनी जानेवारी 2024 अखेर पर्यंत आपल्या लोकप्रिय गाडीची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करणार अशी माहिती समोर आली आहे. किया सॉनेट फेसलिफ्ट या चालू महिन्यातच लॉन्च होणार असे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे या गाडीसाठी बुकिंग देखील सुरू झाली आहे. या महिन्यात या गाडीची किंमत कंपनीच्या माध्यमातून सार्वजनिक केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने लॉन्च होणाऱ्या या गाडीच्या एक्सटेरियर आणि इंटेरियर लूकमध्ये मोठ्या प्रमाणात बदल देखील करण्यात आले आहेत. या गाडीची टाटा नेक्सन, हुंडई वेन्यू, मारुती सुझुकी ब्रेझ्झा या गाड्यांसोबत स्पर्धा राहणार आहे.
Mahindra XUV400 EV फेसलिफ्ट : महिंद्रा ही भारतातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. ही देशातील प्रमुख कार निर्माता कंपनी या चालू वर्षात मोठा धमाका करणार आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार Mahindra XUV400 मध्ये काही नवीन बदल करत नवीन फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
यावेळी कंपनी महिंद्रा XUV400 EV मध्ये 10.25 इंचाची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन ऑफर करणार आहे. याशिवाय या कारमध्ये ग्राहकांना 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल देखील मिळणार आहे.