रॉयल एनफिल्ड चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच लॉंच होणार ‘ही’ नवीन दमदार बाईक, वाचा डिटेल्स

Ahmednagarlive24 office
Published:
Royal Enfield Launching Date

Royal Enfield Launching Date : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेकांनी नवीन वाहन खरेदी करण्याचा प्लॅन बनवला आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेकांनी नवीन वाहन खरेदी केले आहे.

मात्र काही लोकांना येत्या काही दिवसात नवीन वाहन खरेदी करायचे आहे. काही लोक टू व्हीलरची खरेदी करणार आहेत, तर काही लोक नवीन कार खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये आहेत. दरम्यान नवीन टू व्हीलर खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

विशेषता ज्यांना रॉयल इन्फिल्डची बाईक खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास आणि आनंदाचे राहणार आहे. कारण की रॉयल एनफिल्ड या नवीन वर्षात मोठा धमाका करणार असे वृत्त समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रॉयल इन्फिल्ड कंपनी या चालू वर्षात भारतीय बाजारात एक नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

विशेष म्हणजे टू व्हीलर सेगमेंट मध्ये लॉन्च होणारी रॉयल इन्फिल्डची ही नवीन बाईक जबरदस्त फीचर्स दमदार परफॉर्मन्स आणि किलिंग लुकसाठी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरणार असा आशावाद कंपनीच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. अनेक जाणकारांनी देखील रॉयल इन्फिल्डची ही अपकमिंग टू व्हीलर बाइक नवयुवक तरुणांना विशेष आकर्षित करेल असा विश्वास बोलून दाखवला आहे.

कोणती बाईक करणार लाँच ?

रॉयल एनफिल्डच्या बुलेटची क्रेझ संपूर्ण भारतात पाहायला मिळते. या कंपनीची बुलेट ही ग्रामीण भागांपासून ते शहरांपर्यंत सर्वत्र लोकप्रिय गाडी ठरली आहे. विशेष म्हणजे या गाडीची लोकप्रियता डे बाय डे वाढतच आहे. रॉयल इन्फिल्डच्या 350 CC आणि 500 CC मधल्या बाईक्स भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत.

दरम्यान आता कंपनीच्या माध्यमातून 650cc मध्ये नवीन बाईक तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रॉयल एनफिल्ड सध्या आपल्या नवीन बाईकवर काम करत आहे. शॉटगन 650 या नवीन बाईकवर कंपनीच्या माध्यमातून जोरात काम सुरू आहे.

दरम्यान ही नवीन बाइक या चालू वर्षातच लॉन्च होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मार्चमध्ये ही नवीन गाडी लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ३० मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये 648 सीसी इंजिन देण्यात येणार असा अंदाज बांधला जात आहे. यामुळे रॉयल एनफिल्ड 650 सीसी सेगमेंट गाजवणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe