गुड न्युज ! रॉयल एनफिल्ड लवकरच लॉन्च करणार ‘या’ तीन नवीन बाईक, वाचा डिटेल्स

Royal Enfield Upcoming Bike : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक नामांकित बाईक निर्माती कंपनी आहे. या कंपनीची संपूर्ण देशभर क्रेझ आहे. कंपनीची बुलेट सर्वांनाच प्रिय आहे. अनेकांचे बुलेट घेण्याचे स्वप्न आहे. बुलेटसह रॉयल एनफिल्डचे अनेक मॉडेल्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे आता रॉयल इन्फिल्डच्या पोर्टफोलिओ मध्ये आणखी वाढ होणार आहे.

आता रॉयल इन्फिल्डचा पोर्टफोलिओ आणखी रुबाबदार बनणार असे चित्र तयार होत आहे. कारण की कंपनीच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्ये तीन नवीन बाईक लॉन्च केल्या जाणार आहेत. यामुळे जर तुम्ही रॉयल इन्फिल्डचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. दरम्यान आता आपण रॉयल इन्फिल्ड कोणत्या तीन नवीन बाईक लॉन्च करणार आणि त्यांच्या विशेषता काय राहू शकतात याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रॉयल एनफील्ड क्लासिक 650 : रॉयल इन्फिल्डची क्लासिक 350 ही गाडी देशातील एक लोकप्रिय बाईक आहे. या बाईकची देशात मोठ्या प्रमाणात सेलिंग झालेली आहे. अजूनही ही बाईक कंपनीची एक हॉट सेलिंग बाईक म्हणून ओळखली जात आहे. यामुळे गदगद झालेल्या कंपनीने आता या वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत क्लासिक 650 लाँच करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

या नव्याने कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये येणाऱ्या मोटरसायकलमध्ये, ग्राहकांना क्रोम-रिम्ड गोल हेडलाइट, सिग्नेचर पायलट लॅम्प वैशिष्ट्ये, टेल-लॅम्प पॉड आणि 648cc ट्विन-सिलेंडर इंजिन मिळू शकते, असा देखील अंदाज मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आला आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक-350-आधारित बॉबर : मीडिया रिपोर्टनुसार, Royal Enfield लवकरच 350cc मध्ये आणखी एक दमदार गाडी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. साडेतीनशे सीसी मध्ये बॉबर मोटरसायकल कंपनीच्या माध्यमातून लॉन्च केली जाईल अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवली जात आहे.

ही कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये दाखल होणारी बाईक 350cc J-प्लॅटफॉर्मवर आधारित राहू शकते. मात्र, या बाईकच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. ही बाईक या चालू वर्षाच्या अखेरपर्यंत लॉन्च होईल की पुढील वर्षी बाजारात येईल याबाबत कोणतेच अपडेट समोर आलेले नाही.

Royal Enfield Goan Classic 350 : Royal Enfield ही देशातील लोकप्रिय कंपनी आपल्या ग्राहकांसाठी गेल्या काही वर्षांपासून आपल्या मॉडेल्समध्ये मोठ्या सुधारणा करत आहेत. कंपनीने काही काळापूर्वी “Goan Classic 350” हे नाव ट्रेडमार्क केले आणि तेव्हापासून कंपनी या नावाची एखादी मोटरसायकल बाजारात लॉन्च करणार अशा अफवा प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत.

मीडिया रिपोर्ट नुसार कंपनी आपल्या क्लासिक 350 चे डिझाइन आणि फ्रेम कायम ठेवत एक स्टायलिश मोटरसायकल लॉन्च करू शकते आणि याला कंपनीने ट्रेडमार्क केलेले हे नाव दिले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe