टीव्हीएसची iQube स्कूटर खरेदी करण्याची मोठी संधी! वाचतील भरपूर पैसे, ‘या’ ठिकाणी मिळत आहे फायद्याची डील

प्रत्येकजण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात अगोदर पैशांचा विचार किंवा पैशांचा बजेट हा मनात येत असतो व आपल्या बजेटनुसारच ती वस्तू खरेदी करण्याचा विचार केला जातो. तसेच प्रत्येक व्यक्तीचा ट्रेंड जर आपण बघितला तर यामध्ये आपला जास्तीत जास्त पैसा कोणत्या ठिकाणी वाचेल व कुठून आपल्याला चांगली वस्तू मिळेल याकडे असल्याचे दिसून येते.

Ajay Patil
Published:
tvs iqube electric scooter

Discount Offer On Electric Scooter:- प्रत्येकजण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात अगोदर पैशांचा विचार किंवा पैशांचा बजेट हा मनात येत असतो व आपल्या बजेटनुसारच ती वस्तू खरेदी करण्याचा विचार केला जातो. तसेच प्रत्येक व्यक्तीचा ट्रेंड जर आपण बघितला तर यामध्ये आपला जास्तीत जास्त पैसा कोणत्या ठिकाणी वाचेल व कुठून आपल्याला चांगली वस्तू मिळेल याकडे असल्याचे दिसून येते.

अशाच प्रकारचा ट्रेंड आपल्याला वाहनांच्या बाबतीत देखील दिसून येतो. त्यामध्ये देखील आपल्याला कमी किमतीमध्ये चांगले वैशिष्ट्य असलेली कार किंवा स्कूटर किंवा बाईक कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जात असतो.

अगदी तुम्हाला देखील जर पैशांची बचत हवी असेल व उत्तम अशी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार मनात सुरू असेल तर तुम्ही टीव्हीएस मोटरची iQube इलेक्ट्रिक स्कूटर कमी पैशांमध्ये खरेदी करू शकतात. कारण या स्कूटरच्या खरेदीवर फ्लिपकार्ट इयर एण्ड सेलमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट मिळत आहे.

काय आहे नेमकी फ्लिपकार्टची ऑफर?
टीव्हीएस मोटरची आय क्यूब ही महत्त्वाची आणि लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर असून हे वर्ष संपण्याआधी तुम्ही ही स्कूटर खरेदी केली तर तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. फ्लिपकार्ट वर सध्या iQube 2.2 kWh या मॉडेलची जर आपण किंमत बघितली तर ती एक लाख 7 हजार 299 रुपये आहे.

परंतु तुम्हाला flipkart च्या माध्यमातून यावर वीस हजार रुपये पर्यंतची सूट देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट वीस हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या उत्पादनांवर थेट 12 हजार 300 रुपयांची सूट देणार आहे व त्यासोबतच जर क्रेडिट कार्डचा वापर केला तर 2500 रुपये पर्यंत सवलत व ८९५० रुपये पर्यंत अतिरिक्त सवलत सुद्धा मिळू शकणार आहे.

विशेष म्हणजे फ्लिपकार्ट कडून ईएमआय योजना देखील देण्यात येत आहे यामध्ये देखील ग्राहकांना 6000 रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे.

काय आहेत टीव्हीएसच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये?
टीव्हीएसची ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.2 kWh ची आवृत्ती असून ती चार बीएचपी पावर आणि ते 30 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 75 किमी प्रतितास वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्यास सक्षम आहे. तसेच या स्कूटरची बॅटरी 80 टक्के चार्ज होण्यासाठी दोन तास व 45 मिनिटे इतका वेळ लागतो.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पाच इंच टीएफटी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे..जो दिवसा आणि रात्रीच्या दृश्यमानतेसाठी स्वयंचलितपणे ऍडजेस्ट होतो. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरच्या नंबर प्लेटला एलईडी लाईट देण्यात आले आहेत.

तसेच ब्रेकिंग सिस्टीम बघितली तर 220 mm चा फ्रंट डिस्क ब्रेक आणि 130 एमएमचा रियर ड्रम ब्रेक यामध्ये देण्यात आला असून या स्कूटरचा ग्राउंड क्लिअरन्स 157 एमएम इतका आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe