स्कूटर घ्यायची तर कशाला घेता ॲक्टिवा किंवा डीओ! घ्यायची असेल तर घ्या हिरोची ‘ही’ सर्वात दमदार स्कूटर; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
hero xoom scooter

आजच्या परिस्थितीत आपण बाईक मार्केट पाहिले तर यामध्ये अनेक स्पोर्ट बाईकना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मागणी दिसून येते व अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी देखील अशा पद्धतीच्या अनेक स्टायलिश आणि अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या बाईक्स बाजारपेठेत  लॉन्च केलेले आहेत.

परंतु त्या दृष्टिकोनातून आज देखील स्कूटरचे मार्केट देखील तितकेच जोरात असल्याचे दिसून येते. यामध्ये हिरो तसेच होंडा, सुझुकी, यामाहा तसेच बजाज इत्यादी प्रमुख बाईक उत्पादक कंपन्यांनी अनेक आकर्षक अशा स्कूटर बाजारपेठेमध्ये आणलेल्या आहेत.

सध्या जर आपण ग्राहकांची असलेली स्कूटरची पसंती पाहिली तर ती जास्त प्रमाणामध्ये होंडाच्या अॅक्टिवा तसेच डीओ आणि टीव्हीएसच्या जुपिटर इत्यादी बाबत दिसून येते.

परंतु या सगळ्या कंपन्यांच्या स्कूटर्सला तगडी स्पर्धा देईल अशी स्कूटर हिरो मोटोकॉर्प या बाईक उत्पादक कंपनीने लॉन्च केली आहे. या लोकप्रिय स्कूटरचे नाव आहे  Xoom 110 हे होय. ही हिरो  xoom कॉम्बॅट एडिशन या सेगमेंट मधील सर्वात महागड्या स्कूटरपैकी एक आहे.

 कसे आहे हिरोच्या या स्कूटरचे इंजिन आणि पावर?

Xoom एक स्टायलिश स्कूटर असून जी तरुणांना समोर ठेवून तयार करण्यात आलेली आहे. हिरोमोटोकॉर्पने या नवीन एडिशनच्या माध्यमातून विक्री वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंपनीने या स्कूटरच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. या नवीन स्कूटरमध्ये 110.90 सीसी एअर कुल्ड इंजिन देण्यात आले असून जे ८.०५ बीएचपी आणि 8.70 एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच उत्तम ब्रेकिंग सिस्टम करिता कंपनीच्या माध्यमातून या स्कूटरमध्ये 12 इंचाची चाके देण्यात आली असून यामध्ये 190 एमएम फ्रंट डिस्क ब्रेक आणि 130 एमएम ड्रम ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. तसेच हिरो Xoom च्या नवीन एडिशनमध्ये चाके ही मोठ्या आकाराचे देण्यात आलेली असून यात कॉर्नर बेडींग लाइट्स असणार आहेत व ते टर्न घेताना खूप फायद्याचे ठरतील.

तसेच या नवीन स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर असणार आहे व यामध्ये स्मार्टफोन ब्लूटूथ द्वारे कनेक्ट करता येणार आहे. तसेच या माध्यमातून तुम्हाला कॉलर आयडी आणि एसएमएसची माहिती देखील मिळेल.

मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी ग्लोव्ह बॉक्समध्ये एक यूएसबी पोर्ट देखील उपलब्ध असणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे ही स्कूटर ग्रे आणि काळ्या अशा मिक्स रंगात सादर करण्यात आलेली आहे व ही स्कूटर जेट फायटर ग्राफिक सह लॉन्च करण्यात आली आहे.

 किती आहे या हिरो Xoom स्कूटरची किंमत?

या स्कूटरची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत 80 हजार 967 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe