शेतकऱ्यांपासून तर सगळ्यांची आवडती असणारी हिरोची ‘ही’ बाईक झाली महाग! आता मोजावे लागतील इतके पैसे

भारतीय मोटरसायकल म्हणजेच बाईक बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हिरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज तसेच टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाईकचे वर्चस्व दिसून येते. सगळ्या कंपन्यांच्या बाईक या परवडणाऱ्या किमतीन पासून तर काही लाखो रुपयापर्यंत किमतीमध्ये उपलब्ध आहेत व ग्राहकांना त्याच्या त्यांच्या बजेटनुसार बाईक खरेदी करण्याला वाव मिळतो.

Ajay Patil
Published:
splendour plus

Hero Splendor+ Bike:- भारतीय मोटरसायकल म्हणजेच बाईक बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हिरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज तसेच टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाईकचे वर्चस्व दिसून येते. सगळ्या कंपन्यांच्या बाईक या परवडणाऱ्या किमतीन पासून तर काही लाखो रुपयापर्यंत किमतीमध्ये उपलब्ध आहेत व ग्राहकांना त्याच्या त्यांच्या बजेटनुसार बाईक खरेदी करण्याला वाव मिळतो.

यामध्ये हिरो मोटोकॉर्प या कंपनीच्या बाईकच्या दृष्टिकोनातून बघितले तर हिरोची स्प्लेंडर व तिचेच अपडेटेड मॉडेल हिरो स्प्लेंडर प्लस बाईक शेतकऱ्यांपासून तर तरुणांपर्यंत आणि ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सगळ्यांचे आवडती अशी बाईक आहे.

सगळ्याच बाबतीत उत्कृष्ट असलेली ही बाईक हिरो कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाईक म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे उदाहरणादाखल घेतले तर एका महिन्यामध्ये या बाईकच्या तीन लाख पेक्षा जास्त युनिट विकले जातात.

परंतु समोर आलेल्या माहितीनुसार जर बघितले तर तुम्हाला जर आता हिरो स्प्लेंडर प्लस बाईक विकत घ्यायची असेल तर तिच्या किमतीत आता वाढ झाली असल्याने ही बाईक खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागणार आहे. या नवीन वर्षामध्ये कंपनीच्या माध्यमातून या मोटरसायकलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस झाली महाग
हिरो मोटोकोर्पची हिरो स्प्लेंडर प्लसच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत यापूर्वी 75 हजार 441 रुपयांपासून होती व त्यामध्ये आता वाढ करण्यात आली

असून कंपनीच्या संकेतस्थळावरील माहिती बघितली तर त्यानुसार या बाईकच्या किमतीत 1735 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे व आता या वाढीसह ही बाईक 77,176 रुपयांपासून मिळणार आहे.

कसे आहे या बाईकचे इंजिन आणि मायलेज?
या बाईकमध्ये १०० सीसी एअर कुल्ड, चार स्ट्रोक, सिंगल सिलेंडर OHC इंजिन देण्यात आले आहे व जे 5.9 kW पावर आणि 8.05m चा टॉर्क जनरेट करते. इंजिन 4 स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज असून ही बाईक उत्तम मायलेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे. जर मायलेज बघितले तर एका लिटरमध्ये 70 किलोमीटरचे मायलेज ही बाईक देते.

कंपनीने या बाईकला ९.८ लिटरची इंधन टाकी दिली आहे. सिम्पल डिझाईन वाली बाईक म्हणून देखील हिरो स्प्लेंडर प्लसला ओळखले जाते व त्यामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स प्रिंटचा वापर करण्यात आला आहे. तसेच फ्रंट आणि रियर बाजूला 130mm ड्रम ब्रेक आहेत व किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टची सुविधा देखील देण्यात आली आहे.

112 किलो वजनाची ही बाईक असून रोजच्या वापराकरिता उत्तम आहे. डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आले असून या माध्यमातून तुम्हाला रियल टाईम मायलेज विषयी माहिती मिळते.

इतकेच नाही तर या बाईकमध्ये कॉल, एसएमएस, ब्लूटूथ आणि बॅटरी सुविधा देखील देण्यात आली आहे त्यासोबत यूएसबी पोर्ट देण्यात आले असून त्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन चार्ज करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe