भारतीय बाजारपेठेत आज होंडाने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर! एकदा फुल चार्ज कराल तर धावेल 102 किलोमीटर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

होंडा भारतातील बाईक निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून स्कूटर्स तसेच परवडणाऱ्या किमतीमधील उत्कृष्ट अशा बाईक लॉन्च केलेले आहेत. परंतु आज याही पुढे जात कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रामध्ये पदार्पण केले असून भारतीय बाजारपेठेत होंडाने आज पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून या स्कूटरचे नाव एक्टिवा E असे ठेवण्यात आलेले आहे.

Ajay Patil
Published:
honda activa e

Honda Electric Scooter:- होंडा भारतातील बाईक निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून स्कूटर्स तसेच परवडणाऱ्या किमतीमधील उत्कृष्ट अशा बाईक लॉन्च केलेले आहेत.

परंतु आज याही पुढे जात कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रामध्ये पदार्पण केले असून भारतीय बाजारपेठेत होंडाने आज पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून या स्कूटरचे नाव एक्टिवा E असे ठेवण्यात आलेले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने लॉन्च केल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग आजपासून सुरू करण्यात आले असून डिलिव्हरी मात्र फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.या स्कूटरमध्ये अत्याधुनिक असे अनेक फीचर्स देण्यात आले असून नक्कीच भारतीय ग्राहकांमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर लोकप्रिय ठरेल अशी एक शक्यता आहे.

काय आहेत या स्कूटरमधील खास स्पेसिफिकेशन?
होंडा कंपनीने या एक्टिवा E स्कूटर मध्ये 1.5kWh क्षमतेची स्वॅपेबल ड्युअल बॅटरी दिली असून या दोन्ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर साधारणपणे 102 किलोमीटरची रेंज देईल. या दोन्ही बॅटरीना होंडा मोबाईल पावर पॅक म्हणून ओळखले जाते व या होंडा पावर पॅक एनर्जी इंडिया द्वारे डेव्हलप केल्या जातात.

तसेच ही बॅटरी 6KW फिक्स मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटरला पावर देते. ज्या माध्यमातून 22 NM पीक टॉर्क जनरेट करते व या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड देण्यात आले असून ते इकॉन, स्टॅंडर्ड आणि स्पोर्ट अशा प्रकारचे आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 80Km/h इतका आहे.

ही आहेत इतर महत्त्वाची फीचर्स
यासोबतच या एक्टिवा E स्कूटर मध्ये होंडा रोड सिंक डीओ हे स्मार्टफोन एप्लीकेशन देण्यात आले असून ते कनेक्टिव्हिटी साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या स्मार्टफोन एप्लीकेशन मुळे अनेक फीचर ऑपरेट करता येणे शक्य होणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सात इंचाची टीएफटी स्क्रीन देण्यात आलेली असून ही स्क्रीन नेवीगेशनला सपोर्ट करते.

तसेच हँडल बारवर टॉगल स्विच देण्यात आला असून याच्या मदतीने हे कंट्रोल केले जाणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डे आणि नाईट मोड देखील देण्यात आला आहे. तसेच होंडाचे जे काही H स्मार्ट मुख्य फीचर आहे ज्यात स्मार्ट फाइंड, स्मार्ट सेफ, स्मार्ट अनलॉक आणि स्मार्ट स्टार्ट यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरला 12 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत.जे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग्स ने सस्पेंड केलेले आहेत. ब्रेकिंग सिस्टम बघितली तर या स्कूटरला डिस्क- ड्रम ब्रेक कॉम्बिनेशन देण्यात आले असून त्याद्वारे वेगावर उत्तम नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे.

महत्वाचे म्हणजे ही इलेक्ट्रिक स्कूटर पर्ल सेरेनिटी ब्लू, मॅट फोगी सिल्वर मेटॅलिक, पर्ल शेलो ब्लू आणि पर्ल मिस्टी व्हाईट या पाच रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती बाबत बोलायचे झाले तर अजून पर्यंत होंडा कंपनीने या स्कूटरच्या किमती बाबत कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. याबाबत मिळालेले माहितीचा आधार जर घेतला तर या स्कूटरची किंमत येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होईल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe