Honda SP125 Updated Bike:- भारतातील अनेक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या अनेक बाईकचे अपडेटेड मॉडेल लॉन्च करण्यात येत असून यामध्ये आधीच्या मॉडेल पेक्षा अनेक महत्त्वाचे बदल कंपन्यांच्या माध्यमातून केले जात आहेत.
अगदी याच पद्धतीने भारतातील अग्रगण्य असलेली होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीने त्यांच्या होंडा SP 125 चे 2025 मॉडेल भारतामध्ये लॉन्च केले असून या बाईकच्या इंजिनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत व काही कॉस्मेटिक बदल देखील करण्यात आलेले आहेत.
महत्वाचे म्हणजे या अपडेटेड बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेवीगेशन सारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये देण्यात आली असून महत्त्वाचे म्हणजे ही बाईक E-20 पेट्रोलवर देखील चालणार आहे. तसेच दोन व्हेरियंटमध्ये ही बाईक सादर करण्यात आली असून दोन्ही व्हेरिएंटाच्या किमती वेगवेगळ्या आहेत.
कसे आहे नवीन अपडेटेड होंडा एसपी 125 चे डिझाईन?
होंडाच्या माध्यमातून अपडेट केलेल्या बाईकला नवीन एलईडी हेडलँप्स आणि टेललॅम्प देण्यात आला आहे व यासोबत अग्रेसिव्ह टॅंक श्राउड, क्रोम मफलर कव्हर आणि प्रगत असे ग्राफिक्स सोबत शार्प फ्रंट आणि टेल सेक्शन देण्यात आले आहे
व 18 इंचीचे अलॉय व्हील देण्यात आले असून आरामदायी रायडिंग करता यावी याकरिता पुढच्या बाजूला ड्युअल टेलिस्कोपीक फोर्क्स आणि मागच्या बाजूला हायड्रोलिक प्रकारचे सस्पेन्शन सेटअप देण्यात आला आहे. तसेच उत्तम ब्रेकिंग करिता समोर 240mm डिस्क आणि १३० एमएम ब्रेकचा पर्याय देण्यात आला आहे.
कसे आहे या बाईकचे इंजिन?
कंपनी या नवीन अपडेटेड होंडा एसपी 125 बाईकच्या इंजिनमध्ये मोठा बदल केला असून या बाईकमध्ये 123.94 सीसी सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंधन इंजेक्टर इंजिन दिले आहे. जे 10.7 बीएचपी पावर आणि 10.9 एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे व पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह कनेक्ट केलेले आहे.
तसेच OBD2 म्हणजे ऑन बोर्ड डायग्नोस्टिक दुसरी एडिशन प्रणाली वाहनाच्या सर्किट सातत्य, मिस फायर तसेच फिल्टर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवते व ही प्रणाली वाहनातून जे काही उत्सर्जन पसरते त्यावर देखील लक्ष ठेवते व कोणत्याही अनियमिततेबद्दल रायडरला सूचित करते.
इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
तसेच या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि Honda RoadSync ॲप सपोर्ट सह 4.2 इंचाचा TFT डिस्प्ले मिळेल. तसेच उत्तम रायडिंगकरिता यामध्ये नेवीगेशन, व्हॉइस असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच तसेच पासिंग स्विच आणि इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम यासारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहे व याशिवाय यूएसबी टाईप सी चार्जिंग पोर्ट देखील कनेक्ट करण्यात आले आहे.
तसेच या बाईकमध्ये रियर सस्पेन्शन आणि कॉम्बि ब्रेक सिस्टम देखील देण्यात आली आहे. तसेच या बाईकची पकड पातळी सुधारण्याकरिता मागच्या टायरची रुंदी 100 एमएमने वाढवली आहे व यामध्ये PGM-FI तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे व या तंत्रज्ञानामुळे मायलेजच्या बाबतीत देखील ही बाईक उत्तम अशी आहे.
व्हेरिएंटेनुसार या बाईकची किंमत
होंडा कंपनीने ही बाईक दोन प्रकारांमध्ये सादर केली असून अलॉय व्हिल्ससह फ्रंट ड्रम ब्रेक व्हेरीएंटची किंमत 91 हजार 771 रुपये आहे आणि अलॉय व्हिलसह फ्रंट डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत एक लाख २८४ रुपये एक्स शोरूम दिल्लीत आहे.